मुंबई : सध्या सर्वत्र ‘बिग बॉस १६’ ची चर्चा आहे. शोमध्ये प्रत्येक स्पर्धक चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याचं काम करताना दिसत आहेत. दरम्यान टीना आणि शालीन यांच्या नात्याने सर्वांना गोंधळात पाडलं आहे. दोघे अनेकदा भांडताना दिसतात. पण जोरदार भांडणानंतर दोघे पुन्हा एकत्र आल्याने स्पर्धकांना आणि चाहत्यांना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. दरम्यान लाईव्ह शोमध्ये टीना-शालिन इंटिमेट झाल्यामुळे बिग बॉसला मध्येच शो थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
नव्या वर्षानिमित्त बिग बॉसच्या घरात लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. बिग बॉसच्या घरात लाईव्ह कॉन्सर्ट पहिल्यांदा आयोजित करण्यात आला. न्यू ईअर लाईव्ह कॉन्सर्टची जबाबदारी एमसी स्टॅनच्या खांद्यावर होती. एमसी स्टॅनने त्याच्या बँडसह लाईव्ह सादरीकरण केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे एमसी स्टॅनच्या शोसाठी चाहते आणि स्पर्धक दोघे उत्सुक होते. पण सर्वांचं लक्ष टीना आणि शालिनने वेधलं.
कॉन्सर्ट पूर्वी टीना आणि शालिनचं भांडण झालं होतं. टीना कॉन्सर्टला देखील येणार नाही अशी शक्यता स्पर्धकांनी व्यक्त केली. पण बिग बॉसने घोषणा केल्यानंतर टीना गार्डन एरियामध्ये आली. पण कॉन्सर्टला आल्यानंतर टीना आणि शालिनचे हावभाव पूर्णपणे बदलले.
Love is unstoppable #ShaliNa #ShaTina #TinaDatta #ShalinBhanot #BB16 pic.twitter.com/IHQyF5WZ4A
— Teena Singh (@HappinessTeena) January 1, 2023
एमसी स्टॅनच्या शो सुरु असताना टीना आणि शालिन सर्वांसमोर इंटिमेट झाले. यावरून एमसी स्टॅनने दोघांची खिल्ली देखील उडवली, पण त्याचा दोघांना काहीही फरक पडला नाही. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट देखील येत आहेत.
कॉन्सर्ट संपल्यानंतर सर्व स्पर्धक टीना आणि शालिनच्या नात्यावर चर्चा करत होते. यावर साजिद खान म्हणाला, ‘शालिन वाईट व्यक्ती आहे, असं टीना एक दिवस आधी म्हणत होती. शालिनसोबत यापुढे कधीही बोलणार नाही, असं सतत सर्वांना सांगत होती. मग असं काय झालं ज्यामुळे दोघे इंटिमेट झाले.’ सध्या टीना आणि शालिनचं नातं स्पर्धक आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.