सेटवर अभिनेत्रीची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल केल्यानंतर मोठी गोष्ट समोर

| Updated on: Jul 15, 2023 | 2:27 PM

प्रसिद्ध अभिनेत्रीची सेटवर प्रकृती खालावली, तिच्याबद्दल मोठी अपडेट समोर... इन्स्टाग्रामवर अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या प्रकृतीची चर्चा...

सेटवर अभिनेत्रीची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल केल्यानंतर मोठी गोष्ट समोर
Follow us on

मुंबई : सतत शुटिंग, व्यस्त वेळापत्रक, अवेळी जेवण आणि धकाधकीच्या दिवसामुळे शुटिंगच्या सेटवर अनेक सेलिब्रिटीची प्रकृती खालावली. ज्यामुळे प्रसिद्ध सेलिब्रिटींना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं. आता देखील शुटिंगच्या सेटवर एका प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती खालावली ज्यामुळे अभिनेत्रीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एवढंच नाही तर तिच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट देखील समोर आली आहे. सेटवर ज्या अभिनेत्रीची प्रकृती खालावली ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘बिग बॉस १६’ फेम अभिनेत्री टीना दत्ता आहे. सध्या सर्वत्र टीना दत्ता हिची चर्चा सुरु आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या प्रकृतीची अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

टीना दत्ता सध्या ‘हम रहे या ना रहे’ मालिकेच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्रीची सेटवर प्रकृती खालावली. प्रकृती अधिक बिघडल्यानंतर अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. टीनाने तिच्या प्रकृतीची माहिती इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून दिली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत टीना म्हणाली, ‘गेले काही दिवससाठी अत्यंत वाईट होते. प्रकृती खालावल्यामुळे मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनांमुळे मी आता ठिक आहे आणि म्हणून सगळ्यांचे आभार मानते.’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.

पुढे अभिनेत्री म्हणते, ‘ज्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली, त्यांचे आभार मानते. मला रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. माझी तब्येत आता ठिक आहे.’ अभिनेत्रीची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. पण अभिनेत्रीला नक्की काय झालं होतं? हे कळू शकलेलं नाही.

टीना दत्ता सध्या ‘हम रहे या ना रहे’ मालिकेच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मालिकेत टीना हिच्यासोबत अभिनेता जय भानुशाली महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टीना आणि जय यांच्यासोबतच मालिकेत अभिनेता करणवीर बोहरा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सध्या सर्वत्र टीना दत्ता हिच्या प्रकृतीची चर्चा रंगत आहे.

टीना दत्ता हिला ‘उतरन’ मालिकेच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस १६’ मध्ये देखील अभिनेत्री दमदार स्पर्धकांपैकी एक होती. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरात टीना आणि आणि अभिनेता शालिन भनोट यांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली.