Tina Dutta On MC Stan Winning Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ ( Bigg Boss 16 ) आता संपला आहे. १२ फेब्रुवारी रोजी अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान (salman khan) याने मोठ्या उत्साहात ‘बिग बॉस १६’ चा विजेता घोषित केला आणि चाहत्यांना चक्क केलं. ‘बिग बॉस १६’ विजेता म्हणून सलमान याने एमसी स्टॅन (MC Stan) याचं नाव घोषित केलं. ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसी स्टॅन याच्या चेहऱ्यावरील आनंद फार वेगळा होता. बिग बॉस १६ वर स्वतःचं नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅन याने लाईव्ह येत चाहत्यांसोबत संवाद साधला. एमसी स्टॅन विजयी झाल्यानंतर अनेकांनी रॅपरचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या. पण एमसी स्टॅन विजयी झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉस १६ ची स्पर्धक आणि अभिनेत्री टीना दत्ता हिने एमसी स्टॅन विजयी झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने स्टॅन विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
एमसी स्टॅन विजयी झाल्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीना दत्ता म्हणाली, ‘एमसी स्टॅन शोमध्ये जवळपास दीड महिने झोपला होता. त्याला तर घरी जायचं होतं. यंदाच्या शोमध्ये थीम आणि गेम वेगळे होते. बिग बॉसचा खेळ दुसराच होता. ज्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे किंवा जे दुसरा शो जिंकून आले आहेत.. ते काही न करता शो जिंकू शकतात.. असं चित्र याठिकाणी आहे… अशी प्रतिक्रिया टीना दत्ता हिने दिली आहे.
Brand Tina Stating The Facts #TinaDatta #BiggBoss16 pic.twitter.com/lFCUCHAYDa
— ? (@Dear_is_Here) February 15, 2023
सध्या टीनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एमसी स्टॅन विजयी झाल्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीना पुढे म्हणाली, ‘शेवटी आपण बोलणारे कोण?… असं देखील अभिनेत्री म्हणाली. फक्त टीना हिनेच नाही तर, अर्चना गौतम हिने देखील एमसी स्टॅन विजयी झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी शिव ठाकरे नाहीतर, प्रियंका चौधरी यांच्या नावावर होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती.
पण शोचा होस्ट आणि अभिनेता सलमान खान याने ‘बिग बॉस १६’ शोचा विजेता म्हणून एमसी स्टॅन याच्या नावाची घोषणा केली. विजेता म्हणून एमसी स्टॅन याला ३१ लाख ८० हजार रुपये आणि एका कार मिळाली आहे. एवढंच नाहीतर ‘बिग बॉस १६’ च्या घरात फक्त १९ आठवड्यांमध्ये एनसी स्टॅन झाला मालामाला आहे. कारण एक आठवड्यासाठी एमसी स्टॅम मोठी रक्कम घेत होता. एमसी स्टॅन एका आठवड्यासाठी ७ लाख रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
अशाप्रकारे १९ आठवड्यांसाठी एमसी स्टॅन याने तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे. सध्या सर्वत्र रॅपरची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार एमसी स्टॅन याची एकुण संपत्ती जवळपास १६ कोटी रुपये आहे. एमसी स्टॅन त्याच्या रॅपर कॉन्सर्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. (mc stan net worth)