‘टायटॅनिक’ (Titanic) आणि ‘द ओमान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले लोकप्रिय हॉलिवूड अभिनेते डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांचं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. डेव्हिड हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी (cancer) झुंज देत होते. त्यांनी ‘टायटॅनिक’मध्ये दुष्ट नोकर स्पायसर लव्हजॉयची भूमिका साकारली होती. डेव्हिड वॉर्नर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डेव्हिड यांचं रविवारी 24 जुलै रोजी लंडनमध्ये कर्करोगामुळे निधन झालं अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आणि हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. डेव्हिड वॉर्नर यांनी दोन लग्न केले होते. आता त्यांच्या पश्चात पत्नी लिसा, मुलगा ल्यूक आणि सून, पहिली पत्नी हॅरिएट इव्हान्स असा परिवार आहे.
डेव्हिड यांनी आपले अखेरचे दिवस डॅनविले हिल, लंडन याठिकाणी राहून घालवले. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे एक निवृत्ती गृह आहे. डेव्हिड यांनी बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. 1941 मध्ये मँचेस्टरमध्ये जन्मलेल्या डेव्हिड वॉर्नर यांनी ‘लिटिल माल्कम’, ‘ट्रॉन’, ‘टाइम बॅंडिट्स’, ‘स्टार ट्रेक’ आणि ‘द फ्रेंच लिटल वुमन’ यांसह अनेक चित्रपटांत काम केलं. ते 70 आणि 80 च्या दशकातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक होते.
David Warner was a wonderful actor. He was quietly powerful, adept at both drama and comedy. He suffered from stage fright that affected him both physically and mentally; he fought his own demons to do the thing he loved, and thank God he did. #RIPDavidWarner #DavidWarner pic.twitter.com/YtEUkA1By7
— The Sting (@TSting18) July 25, 2022
So sad to hear about the passing of #DavidWarner today. He had so many wonderful roles but I’ve always loved him most in the 1984 TV version of A Christmas Carol, featuring, among many others, George C. Scott as Ebenezer Scrooge and Warner as Bob Cratchit. Rest in peace. pic.twitter.com/vWObRZkNk1
— Mark Tobin ✨ (@marktobindesign) July 25, 2022
डेव्हिड वॉर्नर यांनी रॉयल शेक्सपियर कंपनीत खूप काम केलं. राजा हेन्री सहावा आणि किंग रिचर्ड 2 ची भूमिका साकारून ते स्टार बनले. डेव्हिड यांनी 1965 मध्ये शेक्सपियर कंपनीसाठी हॅम्लेटची भूमिका साकारली होती. त्यांनी टीव्हीच्या दुनियेतही खूप काम केलं. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मॉर्गन: अ सुटेबल केस फॉर ट्रीटमेंट’ या चित्रपटासाठी त्यांना ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारासाठीचं नामांकन मिळालं होतं. 1981 मध्ये डेव्हिड यांनी टीव्ही मिनी-सीरिज ‘मसाडा’साठी एमी अवॉर्ड देखील जिंकला होता.