मुंबई : कन्नड सिनेमाचे सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार (Punit Rajkumar) आज हयात नाही. 29 अॉक्टोबर 2021 ला ह्रदयविकाराच्या छटक्याने त्यांचे निधन झाले. पण त्यांचे चाहते अजूनही त्यांना विसरले नाही. सध्याही ते पुन्हा चर्चेत असल्याचे कारण म्हणजे अँमेझॉन प्राइमने (Amazon Prime video) केलेली घोषणा. पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या तीन महिन्यांनंतर पुनीत राजकुमारशी संबंधित विशेष घोषणा अँमेझॉन प्राइमने केली. अँमेझॉन प्राइमने आपल्या इंन्स्टाग्राम हँडलवर महत्त्वाची माहिती शेअर करत फेब्रुवारी महिन्यात पुनीत राजकुमार यांचे पाच प्रसिद्ध सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर अगदी मोफत दाखवले जातील असे जाहीर केले.
विशेष म्हणजे अॅमेझॉनची प्राइम सबस्क्रीप्शन नसलेल्यांनाही हे सिनेमा पाहता येतील. हे पाच सिनेमाचे निर्माते पुनीत राजकुमार यांची प्रॉडक्शन कंपनी ‘ पीआरके’ आहे. प्राइम व्हिडीओच्या माहितीनुसार ज्यांच्याकडे अँमेझॉनवर खाते आहे ती सुद्धा ‘ फ्री-टू- स्ट्रीम’ प्लाननुसार हे पाच सिनेमे बघू शकतात. ‘ लॉ’, फ्रेंच बिरयानी’, ‘कवलुदारी’, ‘ मायाबाजार’ आणि ‘ युवारत्न’ हे ते पाच सिनेमा आहोत. ही पाचही सिनेमा 2019 ते 2021 दरम्यान रीलीज झाले होते. यापैकी केवळ ‘ युवारत्न’ मध्ये पुनीत राजकुमार मुख्य भूमिकेत होते. अन्य चार सिनेमात इतर कलाकार मुख्य भूमिकेत होते.हे पाच सिनेमे तुम्ही 1 ते 28 फेब्रुवारी दरम्यान कोणत्याही प्राइम सबस्क्रीप्शनशिवाय अँमेझॉनवर बघू शकता.
याशिवाय प्राइम व्हिडीओवर पीआरके प्रॉडक्शनचे तीन सिनेमा ‘ मँन अॉफ द मँच’, ‘ वन कट टू कट’,’ फँमिली पँक’ यांनी याच प्लँटफॉर्मवर स्ट्रीम करण्याची घोषणा केली आहे. जागरणच्या माहितीनुसार, पीआरके प्रॉडक्शन सोबत काम करताना अँमेझॉन प्राइम व्हिडीओचे कंन्टेन्ट लाइसेंसिंग हेड मनीष सि़ंघानी म्हणाले की, दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांच्याशी अजूनही जवळीक वाटते. पुनीत राजकुमार यांचा क्रिएटिव्ह एक्सलन्स आणि स्टोरीटेलिंगचा दृष्टिकोनाला श्रद्धांजली देण्याचा हा प्रयत्न आहे. सिनेमासृष्टीसाठी पुनीत राजकुमार यांचे योगदान खूप मोठे आहे. भारत आणि भारताबाहेरही त्यांचे फँन्स आणि प्रेक्षकांसाठी हा एक वेगळा अनुभव असेल असा विश्वास मनीष यांनी व्यक्त केला.
सिनेमाप्रती पुनीत राजकुमार यांच्या व्हिजनला प्रेक्षकांना नेहमीच चकित केले आहे. त्याच प्रभावातून पुनीत राजकुमार यांची फँन फॉलोइंग मोठी आहे. ते प्रेक्षकांचा सन्मानास पात्र ठरले. त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. या तिन्ही सिनेमांची घोषणा दिवंगत अभिनेता आणि निर्माते पुनीत राजकुमार आणि त्यांच्या कलेप्रती असलेला आदर याला श्रद्धांजली आहे. सिनेसृष्टीतील त्यांचे योगदान मोठे आहे असे पीआरके कंपनीच्या निर्मात्या आणि पुनीत राजकुमार यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार म्हणाल्या.
इतर बातम्या :
सलमान-प्रज्ञा जैस्वालचा रोमान्स, गर्लफ्रेंड यूलिया वंतूरच्या आवाजाची जादू; गाणं होतंय व्हायरल