तृप्ती डिमरी सतत चर्चेत असते. आधी बॅड न्यूज मग भुलभुलैया 3 आणि नंतर विक्की विद्या का वो वाला वीडियो या अभिनेत्रीचे वर्षभरात तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. त्यातला एकच हिट ठरला ही वेगळी गोष्ट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तृप्तीचे नाव आशिकी 3 सोबत जोडले जात होते. मात्र ताज्या अपडेटनुसार तिला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रोफेशनल लाईफ सोबतच तृप्ती तिच्या पर्सनल लाईफ मुळे देखील चर्चा असते. काही दिवसांपासून अशी बातमी येत होती की अभिनेत्री बिजनेस मॅन सॅम मर्चंटला डेट करत आहे. या दोघांचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. या सगळ्यादरम्यान या अभिनेत्रीला मुलाखती दरम्यान एका अभिनेत्याला डेट करण्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा तिने मजेशीर उत्तर दिले.
सॅम मर्चंट आणि तृप्ती डिमरी एका आउटिंग दरम्यान एकत्र दिसले होते. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र यावर अभिनेत्रीने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. खरंतर तिला अभिनेत्याला डेट करण्याबद्दल विचारण्यात आलेला प्रश्नाचे उत्तर तिने वेगळ्या पद्धतीने दिले.
अभिनेत्याला डेट करणार तृप्ती?
तृप्ती डिमरीने नुकतीच फिल्मफेअरला एक मुलाखत दिली ज्यामध्ये तिने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान तृप्तीला विचारण्यात आले होते की ती कधी एखाद्या अभिनेत्याला डेट करणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना तृप्ती म्हणाली की कदाचित असे होणार नाही. कारण एक व्यक्ती सतत व्यस्त असेल तर किमान दुसरी व्यक्ती तरी कामापासून थोडीशी फ्री असणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हाला एकमेकांना भेटायला वेळ मिळेल. ती पुढे म्हणाले की अभिनय करण्यासाठी खूप ऊर्जा लागते आणि त्यांची जीवनशैली ही खूप व्यस्त असते.
सॅम मर्चंटला डेट करत्ये तृप्ती?
जेव्हा तृप्तीला विचारण्यात आले की तिच्या जोडीदाराने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत फ्लर्ट केलेले तिला आवडेल का ती नाराज होईल का? यावर तृप्ती म्हणाली की हो मी नाराज होईल आणि यापुढे ती असं देखील म्हणाली की तिला वाटत नाही की तिला कोणत्याही अभिनेत्याला डेट करण्यासाठी वेळ मिळेल. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास अलीकडेच ते युरोप मध्ये होती आणि तिथे तिने नवीन वर्ष साजरे केले. तिने फिनलैंड आणि स्वीडन गेटवेचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम वर पोस्ट केले होते. यामध्ये विशेष असे की त्याच वेळी सॅम मर्चंटने सुद्धा त्याच ठिकाणाचे फोटोज पोस्ट गेले होते. मग चहात्यांच्या अंदाजानुसार कदाचित हे दोघं तिथे एकत्र सुट्टी घालवत होते.