लोकसभा निवडणूक निकालानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या नावाने करण्यात आलेलं एक ट्विट तुफान चर्चेत आलं आहे. या ट्विटद्वारे अयोध्येतील निकालाबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र ट्विट करणारं हे अकाऊंट सोनू निगमचं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सोनू निगमच्या नावाचं अकाऊंट असणाऱ्या दुसऱ्या युजरने हे ट्विट केलं होतं. अकाऊंटचं नाव आणि त्यावरील ‘ब्ल्यू टीक’ पाहून अनेकांचा गैरसमज झाला होता. मात्र तो अकाऊंट गायक सोनू निगमचा नसून सोनू निगम असं नाव असणाऱ्या बिहारमधील एका वकिलाचा आहे. संबंधित वकिलाने ट्विट करत त्याचीही बाजू मांडली आहे. गायक सोनू निगमने 2017 मध्येच ट्विटरवरून त्याचा अधिकृत अकाऊंट काढला होता. मात्र त्याच्या नावाने अनेक फेक अकाऊंट सध्या एक्सवर (ट्विटर) सक्रिय आहेत.
याविषयी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोनू निगम म्हणाला, “लोकांचा आणि वृत्तवाहिन्यांचाही गैरसमज कसा झाला, हा मला प्रश्न पडतो. त्यांनी त्या अकाऊंटचं डिस्क्रिप्शन वाचण्याचीही तसदी घेतली नाही. त्यात त्याचं नाव सोनू निगम सिंह असं लिहिलं आहे आणि तो बिहारमधील वकील आहे. अशाच मूर्खपणामुळे मला सात वर्षांपूर्वी ट्विटर सोडावं लागलं होतं. मी कधीच राजकीय टिप्पणी करत नाही. मी फक्त माझ्या कामावरच लक्ष केंद्रीत करतो. पण अशा घटना खरंच चिंताजनक आहेत. हे फक्त माझ्यापुरतंच मर्यादित नाही, तर माझ्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. मला त्या युजरच्या ट्विट्सचे स्क्रीनशॉट याआधीही अनेकांनी पाठवले होते. माझ्या टीमने त्याच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी अकाऊंटचं नाव बदलण्याचा सल्ला दिला आहे. कारण लाखो लोकांचा यामुळे गैरसमज होतोय.”
Hello Everyone,
I, Sonu Nigam, am writing to address the recent allegations made against me by the singer Sonu Nigam as reported in the captioned link. It has come to my attention that Mr. Nigam has expressed concerns and is planning to take legal action against me accusing me… pic.twitter.com/JIYdedOMvG
— Sonu Nigam (@SonuNigamSingh) June 6, 2024
‘ज्या सरकारने संपूर्ण अयोध्येला चमकावलं, नवीन एअरपोर्ट दिला, रेल्वे स्टेशन दिलं, 500 वर्षांनंतर राम मंदिर बनवलं, संपूर्ण टेंपल इकोनॉमी बनवून दिलं. त्याच पार्टीला अयोध्येच्या जागेवरून संघर्ष करावा लागतोय. अयोध्यावासींसाठी हे अत्यंत लज्जास्पद आहे,’ अशा आशयाचं हे ट्विट होतं. राममंदिर उभारणीनंतर अवघ्या काही महिन्यांनी अयोध्येमध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झाला.
जिस सरकार ने पूरे अयोध्या को चमका दिया, नया एयरपोर्ट दिया, रेलवे स्टेशन दिया, 500 सालों के बाद राम मंदिर बनवाकर दिया, पूरी की पूरी एक टेंपल इकोनॉमी बनाकर दी उस पार्टी को अयोध्या जी सीट पर संघर्ष करना पड़ रहा है।
शर्मनाक है अयोध्यावासियों!
— Sonu Nigam (@SonuNigamSingh) June 4, 2024
सोनू निगम सिंह नावाच्या या युजरने ट्विट करत आपली बाजू मांडली आहे. त्याने लिहिलंय, ‘माझं नाव सोनू निगम असंच आहे. माझ्या आईवडिलांनी माझं नाव ठेवलंय आणि कागदोपत्रीही हेच नाव आहे. माझी स्वत:ची एक ओळख आहे, मला दुसरी व्यक्ती असल्याचं भासवण्याची काहीच गरज नाही. माझ्या ट्विटर अकाऊंटवर मी कोणतीच चुकीची माहिती दिलेली नाही. त्यात असं स्पष्ट लिहिलंय की माझं नाव सोनू निगम सिंह असून मी बिहारमधील क्रिमिनल लॉयर आहे.’