मुंबई : शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधी आणि त्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले बरेच बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. नुकताच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत. पहिल्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर त्याची चांगली कमाई झाली. कमाईचा हा आकडा 70 कोटी रुपयांहून अधिक झाला. मात्र सहाव्या दिवशी (सोमवारी) कमाईत घसरण पहायला मिळाली.
‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी 6.03 कोटी रुपये कमावले आहेत. सोमवारी चित्रपटाच्या कमाईत जवळपास 60 टक्क्यांहून अधिक घट झाली. पहिल्याच दिवशी रणबीर-श्रद्धाच्या या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने 15 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता.
बुधवार- 15.73 कोटी रुपये
गुरुवार- 10.34 कोटी रुपये
शुक्रवार- 10.52 कोटी रुपये
शनिवार- 16.57 कोटी रुपये
रविवार 17.08 कोटी रुपये
सोमवार 6.05 कोटी रुपये
एकूण- 76.29 कोटी रुपये
#TuJhoothiMainMakkaar collects a decent number on Mon [Day 6]… National chains continue to lead, mass pockets remain ordinary/below par… Wed 15.73 cr, Thu 10.34 cr, Fri 10.52 cr, Sat 16.57 cr, Sun 17.08 cr, Mon 6.05 cr. Total: ₹ 76.29 cr. #India biz. #TJMM pic.twitter.com/cC42wu6otg
— taran adarsh (@taran_adarsh) March 14, 2023
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने सोमवारी नॅशनल चेन्समधून 3.03 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यामध्ये पीव्हीआरमधून 1.41 कोटी रुपये, आयनॉक्समधून 98 लाख रुपये आणि सिनेपोलीसमधून 64 लाख रुपयांची कमाई झाली.
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र झळकले आहेत. ‘पठाण’नंतर ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने केलेली कमाई चांगली मानली जात आहे. या आठवड्यात हा चित्रपट 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चित्रपटात रणबीर आणि श्रद्धासोबतच डिंपल कपाडिया, बोनी कपूर, अनुभव सिंह बस्सी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मध्यांतरानंतर चित्रपटातील एंटरटेन्मेंटचा डोस डबल होतो. यामध्ये कार्तिक आर्यन आणि नुशरत भरूचा यांची खास एण्ट्रीसुद्धा पहायला मिळते. हा एक परफेक्ट लव रंजन चित्रपट आहे. खळखळून हसवतानाच हा चित्रपट तुम्हाला कधी भावूक करेल, हे कळणार नाही. मोनोलॉग आणि इतर संवाद यांमुळे कथा आणखी मजबूत वाटते. या चित्रपटाचा क्लायमॅक्स सर्वांत मजेशीर आहे.
बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये असा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. जवळपास 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 8 मार्च रोजी देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला.