‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दाताचं कमबॅक; ‘अबीर गुलाल’मध्ये अत्यंत विरोधी भूमिका

| Updated on: May 02, 2024 | 5:06 PM

गायत्री दातार ही 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचली. यामध्ये तिने ईशाची भूमिका साकारली होती. याच मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिला खास ओळख मिळाली. मध्यंतरीच्या काळात ती 'चला हवा येऊ द्या'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

तुला पाहते रे फेम गायत्री दाताचं कमबॅक; अबीर गुलालमध्ये अत्यंत विरोधी भूमिका
Gayatri Datar
Image Credit source: Instagram
Follow us on

कलर्स मराठी वाहिनीवर येत्या काळात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याची सुरुवात ‘इंद्रायणी’ मालिकेपासून झाली. त्यानंतर स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ या मालिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं. या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता आणखी एक नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अबीर गुलाल’ असं या मालिकेचं नाव असून त्याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सावळी मुलगी एका गोऱ्या कुटुंबीयांच्या घरात तर गोरी मुलगी सावळ्या आणि श्रीमंत घरात दिसून येत आहे.

या सावळ्या मुलीचे नाव श्री तर गोऱ्या मुलीचे नाव शुभ्रा असून असं. शुभ्रा ही तिच्या आईवडिलांची लाडकी आहे पण ती त्यांच्या वर्णामुळे त्यांच्यासोबत वाईट वागत आहे. तर दुसरीकडे श्रीच्या घरात सगळे गोरे असून तिचे वडील तिला सावळ्या रंगामुळे वाईट वागणूक देत आहेत. श्रीचा स्वभाव मनमोकळा, निरागस आणि प्रेमळ तर शुभ्राचा रागीट स्वभाव पाहायला मिळत आहे. श्री आणि शुभ्राची ही अनोखी गोष्ट प्रेक्षकांना ‘अबीर गुलाल’ या मालिकेत पहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

या नव्या मालिकेत पायल जाधव आणि गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘अबीर गुलाल’ या मालिकेत अजून कोणती स्टारकास्ट असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. गायत्री दातारने या मालिकेतून पुनरागमन केलं आहे. याआधी तिची ‘तुला पाहते रे’ ही मालिका खूप गाजली होती. यामध्ये तिने सुबोध भावेसोबत काम केलं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’मध्ये तिने भाग घेतला होता. आता गायत्री पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत पहायला मिळतेय.

या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हा प्रोमो आवडला तर काहींनी त्याच्या संकल्पनेवरून प्रश्न उपस्थित केला. नेहमीच वर्णावर मालिकेची कथा अवलंबून का असते, असं काहींनी विचारलंय. तर काळं-गोरं ही संकल्पनाच किती जुनाट आहे, असं काहींनी म्हटलंय.