मराठमोळी अभिनेत्री शिवानी रांगोळे कायम तिच्या लूक आणि अभिनयामुळे चर्चेत असते. पण आता शिवानी तिच्या अभिनयामुळे नाहीतर, एका खास फोटोमुळे चर्चेत आली आहे. सध्या शिवानी हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा फोटो प्रचंड आवडला आहे. शिवानी हिने स्विमिंग पूलमधील स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
सांगायचं झालं तर, शिवानी सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारत आहे. अक्षराच्या भूमिकेत दिसणाऱ्या शिवानी हिचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. साडी, दागिने, हातात बांगड्या अशा लूकमध्ये दिसणाऱ्या शिवानी हिला नव्या लूकमध्ये पाहिल्यानंतर चाहत्यांच्या देखील काळजाचा ठोका चुकला आहे.
स्विमिंग पूलमधील फोटो पोस्ट करत शिवानी हिने कॅप्शनमध्ये ‘स्विमिंग पूलमधून सूर्यास्त पाहण्याचा आनंदा वेगळाच असतो…’ असं लिहिलं आहे.शिवानी हिचा फोटो पाहिल्यानंतर चाहते कमेंट करत आहेत. एक नेटकरी शिवानी हिच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘आई साहेब मारतील की…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मास्तरीन बाई…’, तिसरा नेटकरी म्हणाला, “काय मस्त दिसताय…सोज्वळ मास्तरीण बाई” सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिवानी हिच्या फोटोची चर्चा रंगली आहे.
शिवानी हिने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या शिवानी ‘मास्तरीण बाई…’ म्हणून चर्चेत आहे. ‘सांग तू आहेस का?’, ‘बन मस्का’, ‘आम्ही दोघी’ या मालिकांमध्ये देखील शिवानी हिने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
शिवानी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. शिवानी हिने 2022 मध्ये अभिनेता विराजस कुलकर्णी याच्यासोबत लग्न केलं. विराजस – शिवानी यांच्या लग्नात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. शिवानी पती विराजस याच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते.