श्रद्धा वालकर हत्येनंतर तुनिशा-शिझानचं ब्रेकअप? चौकशीत सत्य उघड

| Updated on: Dec 27, 2022 | 11:08 AM

सुरुवातीला शिझान चौकशीला सहकार्य करत नव्हता, पण अभिनेत्याने पोलिसांकडे मोठा खुलासा केला आहे.

श्रद्धा वालकर हत्येनंतर तुनिशा-शिझानचं ब्रेकअप? चौकशीत सत्य उघड
श्रद्धा वालकर हत्येनंतर तुनिशा-शिझानचं ब्रेकअप? चौकशीत सत्य उघड
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

Tunisha Sharma Death Case: अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तुनिशाने गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. बॉयफ्रेंड शिाझान खानच्या (Sheezan Mohammed Khan)मेकअप रुममध्ये तुनिशाने अखेरचा श्वास घेतल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. याप्रकरणी शिझानची चौकशी करण्यासाठी अभिनेत्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरुवातीला शिझान चौकशीला सहकार्य करत नव्हता, पण आता त्याने पोलिसांकडे मोठा खुलासा केला आहे.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, शिझानने सांगितलं की, तो श्रद्धा वालकर हत्येनंतर देशात तापलेल्या वातावरणामुळे चिंतेत होता.’ श्रद्धा वालकर हत्याप्रकरणानंतर शिझान हैराण होता आणि म्हणून त्याने तुनिशासोबत असलेलं नातं संपवलं असल्याचं समोर येत आहे.

शिझानने पोलिसांना सांगितलं की, ‘श्रद्धा वालकर हत्येनंतर देशात उमटलेले पडसाद पाहून तुनिशासोबत ब्रेकअप केलं. आमच्या दोघांचा धर्म वेगळा होता आणि आमच्यात वयाचं अंतर देखील फार होतं. म्हणून मी तुनिशासोबत ब्रेकअप केलं अशी कबुली शिझानने दिली असल्याचं समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

पुढे शिझानने पोलीस चौकशीत मोठा खुलासा केला. ‘याआधी देखील तुनिशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी तिला वाचवलं आणि तिच्या आईला तुनिशाची काळजी घ्या असं देखील सांगितलं.’ अशी माहिती शिझाने पोलिसांना दिली.

दरम्यान, तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शिझानवर गंभीर आरोप केले. ‘शिझानने तुनिशाला फसवलं आहे. शिझान तुनिशासोबत रिलेशनशीपमध्ये होता. त्याने तुनिशाला लग्न करण्याचं वचन देखील दिलं होतं. पण तुनिशाच्या आधी त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती.’

तुनिशाच्या आई पुढे म्हणाल्या, ‘शिझानच्या आयुष्यात आधी एक मुलगी असताना देखील त्याने जवळपास 4 महिने माझ्या मुलीचा वापर केला. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. माझं बाळ गेलं…’ अशी भावना तुनिशाच्या आईने व्यक्त केल्या आहेत.

सध्या तुनिशा आत्महत्ये प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. आता तुनिशा प्रकरणाला नवीन वळण मिळाल्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.