Ritu Raj Singh : अभिनेते ऋतुराज सिंग यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी ऋतुराज यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ऋतुराज सिंग यांनी अपनी बात, ज्योति, हिटलर दीदी, शपथ, वॉरियर हाय, आहट और अदालत, दीया और बाती हम यांसारख्या अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. दरम्यान, अचानक ऋतुराज सिंग यांच्या निधनाची बातमी समोर आल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज सिंग यांच्या निधनानंतर लिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
सांगायचं झालं तर, ऋतुराज सिंग लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत होती. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर मालिकेतील अन्य कलाकारांना देखील मोठी धक्का बसला आहे. रिपोर्टनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे ऋतुराज सिंग यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी रात्री 12.30 वाजता ऋतुराज सिंग यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
ऋतुराज सिंग यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ऋतुराज सिंग यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ऋतुराज सिंग यांचं संपूर्ण नाव ऋतुराज सिंग चंद्रावत सिसोदिया असं आहे. ऋतुराज सिंग यांचा जन्म कोटा, राजस्थान याठिकाणी झाला होता. राजपूत कुटुंबात ऋतुराज सिंग यांचा जन्म झाला होता.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऋतुराज सिंग स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मायानगरीत दाखल झाले. ऋतुराज सिंग यांनी आतापर्यंत ‘राजनिती’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऋतुराज सिंग यांच्या निधनाची चर्चा सुरु आहे.
ऋतुराज सिंग यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. एक नेटकरी शोक व्यक्त करत म्हणाला, ‘उत्तम अभिनेत्याला देवाने लवकर बोलवून घेतलं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अनुपमा मालिकेत त्यांची भूमिका उल्लेखनिय होती.’, ‘त्यांच्या जाण्याची ही योग्य वेळ नव्हती…’ असं देखील नेटकरी म्हणाले.