लग्नाच्या चार महिन्यांनंतर कोणावर भडकली गोविंदाची भाची, आरतीचा ‘तो’ व्हिडीओ…

| Updated on: Aug 31, 2024 | 1:33 PM

अभिनेत्री आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आरती सिंह हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. आरतीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आरती ही सतत सोशल मीडियावर तिच्या हनिमूनचे फोटो शेअर करताना दिसते.

लग्नाच्या चार महिन्यांनंतर कोणावर भडकली गोविंदाची भाची, आरतीचा तो व्हिडीओ...
Arti Singh
Follow us on

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची भाची आणि कृष्णा अभिषेक याची बहीण आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. काही दिवसांपूर्वीच आरती सिंह हिने बिझनेसमॅन दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसले. आपल्या लग्नात आरती धमाल करताना दिसली. आरती ही बिग बॉस सीजन 13 मध्येही सहभागी झाली होती. आरती हिच्या लग्नाला मामा गोविंदा हा देखील सर्व वाद विसरून पोहोचला होता. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यात वाद सुरू होते. एका शोमध्ये मामा गोविंदाबद्दल कृष्णाने मोठे भाष्य केले होते, जे गोविंदाला अजिबातच आवडले नव्हते. 

आरती सिंह ही दीपक चाैहान याच्यासोबतच्या लग्नानंतर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. ती आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसत आहे. लग्नानंतर सतत हनिमूनवर जाताना आरती दिसत आहे. आपल्या हनिमूनचे खास फोटोही आरतीने शेअर केले आहेत.

आता नुकताच आरती सिंह हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये ती भडकताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एका फेमस डॉयलॉगवर आरती सिंह ही लिपसिंक करताना दिसत आहे. आरती सिंह हिचा हा अंदाज लोकांना चांगलाच आवडल्याचे दिसतंय. आता आरतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

एकाने लिहिले की, तुम्ही अभिनय जबरदस्त करता. दुसऱ्याने लिहिले की, तुम्हाला टीव्हीवर बघायचे आहे. 25 एप्रिल रोजी दीपक चाैहान याच्यासोबत आरती सिंह हिचे लग्न झाले. लग्नाला चार महिने पूर्ण होत नाहीत तोवरच दीपक आणि आरती यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. आरती आणि दीपक विभक्त होणार असल्याचे सांगितले गेले.

यावर आरती सिंह हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, ती दीपक चाैहान याच्यासोबत घटस्फोट घेणार नाहीये. आरती सिंह हिची वहिणी आणि कृष्णा अभिषेक याची पत्नी कश्मीरा शाह हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आरती सिंह हिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला. लग्न होत नसल्याने आणि वाढत्या वयामुळे आरती त्रस्त होती, असे कश्मीरा शाहने म्हटले होते.