अभिनेत्री दलजीत काैर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दलजीत काैर हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. हेच नाही तर दलजीत ही टीव्ही मालिकांमध्येही धमाका करताना दिसली. दलजीत काैर हिने शालिन भनोट याच्यासोबत लग्न केले होते. शालिन आणि दलजीतचा एक मुलगा देखील आहे. मात्र, यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. दलजीत काैर हिने दहा महिन्यांच्या अगोदर केन्याचा बेस्ट बिझनेसमॅन निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. काही वर्ष हे एकमेकांच्या संपर्कात होते. निखिल पटेल याचे देखील दलजीतसोबतचे दुसरे लग्न होते. भारतात अत्यंत खास पद्धतीने यांचा विवाहसोहळा हा पार पडला.
लग्न होऊन काही महिने पूर्ण होताच दलजीत काैर ही केन्यावरून भारतात परतली. हेच नाही तर दलजीत काैर हिने पती निखिल पटेल याच्यावर अत्यंत गंभीर आरोपही केले. आता दलजीत काैर आणि निखिल पटेल यांचा वाद थेट कोर्टात पोहोचलाय. दलजीत काैर हिच्या आरोपांनंतर निखिल पटेल यानेही तिच्यावर काही आरोप केले.
आता नुकताच दलजीत काैर ही केन्यामध्ये पोहोचली. यावेळी दलजीत ही निखिल पटेल याच्या घरी तिचे राहिलेले सामान घेण्यासाठी गेली असता तिला खालीच सुरक्षारक्षकांकडून रोखण्यात आले. तिला वरती जाण्यास मनाई असल्याचे सांगितले गेले. तिथे बराच गोंधळ झाला आणि दलजीत काैर ही थेट केन्याच्या पोलिस ठाण्यात जाऊन पोहोचली.
यावेळी दलजीत काैर हिने निखिल पटेलच्या विरोधात तक्रार दिलेली असल्याचेही सांगितले जातंय. ज्यावेळी सुरक्षारक्षक हे दलजीत काैरला आतमध्ये सोडत नव्हते, त्यावेळी निखिल पटेल हा गाडीमध्ये बसून सर्व तमाशा बघत असल्याचे देखील दलजीत काैर हिने म्हटले आहे. निखिल पटेल याच्याकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते की, दलजीत काैर हिने तिचे साहित्य घेऊन जावे नाही तर ते दान केले जाईल.
यावर कोर्टाने म्हटले होते की, दलजीत काैरचे हे सामान तिच्या लग्नाचे असल्याने निखिल हे कोणालाही दान करू शकत नाही. त्यावर निखिल पटेल याच्या वकिलाने म्हटले की, त्यांचे लग्नच झाले नाही तर लग्नाचे सामान कसे? पोलिस स्टेशनमध्ये दलजीत काैर हिने तिच्या आणि निखिलच्या लग्नाचे फोटो दाखवल्याचे देखील सांगितले जाते.