अभिनेत्री दलजीत काैर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दलजीत काैरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दलजीत काैर ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दलजीत काैर हिने काही महिन्यांपूर्वीच निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. लग्नाला काही महिने पूर्ण होत नाहीत तोवर निखिल पटेल याच्यावर गंभीर आरोप दलजीत काैरने केले. दलजीत काैर ही ज्यावेळी केन्यातून भारतामध्ये दाखल झाली, त्यावेळीच तिच्या आणि निखिलच्या घटस्फोटाची चर्चा रंगताना दिसली. मात्र, त्यावेळी तिने त्यावर भाष्य करणे टाळले.
दलजीत काैर हिच्या आरोपानंतर निखिल पटेल याने देखील तिच्यावर गंभीर आरोप केले. आता दलजीत आणि निखिल यांचे हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले आहे. निखिलसोबतच्या घटस्फोटामध्येच दलजीत ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. अनेक पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.
दलजीत काैर हिने नुकताच मोठा खुलासा केलाय. दलजीत काैर ही म्हणाली की, मी ज्यावेळी निखिलसोबत लग्न करून विदेशात जात होते, त्यावेळी माझ्या आईने तिची एक साडी मला भेट म्हणून दिली होती. पतीच्या घरी जात असताना आईने दिलेली साडी माझ्यासाठी नक्कीच खूप महत्वाची होती आणि अनेक भावना त्यामागे होत्या.
माझ्या आईने दिलेल्या साडीचे निखिलला सोफा कव्हर करायचे होते. मात्र, माझी इच्छा नव्हती. शेवटी मी त्याच्या प्रेमासाठी त्या साडीचे सोफा कव्हर करण्याची परवानगी दिली. आईने दिलेली साडी ज्यावेळी फाडली जात होती, त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू येत असल्याचे सांगताना दलजीत काैर ही दिसली.
दलजीत काैर ही सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वीच दलजीत काैर हिने तिच्या केन्यातील घराच्या भीतीचा एक फोटो शेअर केला होता. काही आठवणी सांगताना दलजीत काैर दिसली होती. निखिल पटेल हा त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये आला होता, त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.