देवोलीना भट्टाचार्य हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. देवोलीना भट्टाचार्यची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. देवोलीना भट्टाचार्यला खरी ओळख ही साथ निभाना साथीया या मालिकेतून मिळालीये. देवोलीना भट्टाचार्य ही टीव्ही मालिकांमध्ये गेल्या 13 वर्षांपासून काम करतंय. देवोलीना भट्टाचार्य सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. देवोलीना भट्टाचार्य हिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय.
देवोलीना भट्टाचार्य हिने व्हिडीओ शेअर केल्यानंतर लोक तिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. देवोलीना भट्टाचार्य हिला टीव्ही मालिकांमध्ये काम करून 13 वर्ष पूर्ण होत असल्याने देवोलीनाने तिच्या घरी एका पूजेचे आयोजन केले. यावेळी तिने घरी सत्यनारायणची पूजा ठेवली. हेच नाहीतर खास जेवणही तिने तयार केले.
यावेळी होम हवन करतानाही देवोलीना भट्टाचार्य ही दिसत आहे. मात्र, सर्व पूजा देवोलीना भट्टाचार्य ही एकटीच करत आहे. पूजेनंतर तिने खास केक कट करूनही सेलिब्रेशन केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पूजा करताना कुठेही तिचा पती दिसत नाहीये. मात्र, केक कट करताना तिचा पती दिसत आहे.
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, सत्यनारायणची पूजा पतीसोबत मिळू करतात. हिने मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केले फक्त लोकांना दाखवण्यासाठी अशाप्रकारच्या पूजा वगैरे करते. दुसऱ्याने लिहिले की, या देवोलीना भट्टाचार्यने हिंदू धर्माचा मजाक बनवला आहे. काहीही करते ही…तिसऱ्याने लिहिले की, तू मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केले तू हे असे नाटक नेमके का करते हेच मला मुळात कधी कळत नाही.
लोक या व्हिडीओनंतर सतत देवोलीना भट्टाचार्य हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. लोकांना देवोलीना भट्टाचार्य हिने अशाप्रकारे पूजा करणे अजिबातच आवडले नसल्याचे या व्हिडीओवरून स्पष्ट दिसत आहे. देवोलीना भट्टाचार्य हिने काही दिवसांपूर्वीच दोन लग्न केल्याने अरमान मलिक याच्यावर जोरदार टीका केली. यानंतर अरमान मलिकची पहिली पत्नी अर्थात पायल हिने देवोलीना भट्टाचार्यचा व्हिडीओ शेअर करत क्लास लावला होता.