अभिनेत्री मौनी रॉय हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. टीव्ही विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मौनी हिने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण आता अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाही तर, प्रकृतीमुळे चर्चेत आली आहे. नुकताच, झालेल्या एका मुलाखतीत मौनी हिने तिच्या आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल सांगितलं आहे. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री उठू शकत नव्हती, दिवसातून 30 – 30 गोळ्या तर कधी इंजेक्शन अभिनेत्रीला घ्यावे लागत होते.
मौनी रॉय म्हणाली, ‘नागीन मालिका सुरु होण्यापूर्वी माझी प्रकृती प्रचंड खालावली होती. मी कायम अस्वस्थ असायची. एकावेळी मला असं वाटलं की माझं आयुष्य संपलं आहे. मी खूप आजारी होती. मी ‘झलक दिखला जा 9′ पूर्ण केलं आणि माझ्य पाठीचा कणा मोडला होता…’
‘स्लिप डीजनरेशन आणि स्कोलियोसिस झाल्यामुळे मी सरळ उभं देखील राहता येत नव्हतं… नागीन मालिकेसाठी ऑफर आली तेव्हा मी तीन महिने अंथरुणात होती. माझं वजन दिवसागणिक वाढत होतं. कारण मी दिवसाला 30 गोळ्या खात होती. कधीकधी इंजेक्शन देखील घ्यावे लागत होते…’ अनेक वर्षांनंतर मौनी हिने स्वतःच्या आयुष्यातील वाईट दिवसांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, ‘नागीन’ मालिका ऑफर केल्याबद्दल मौनी हिने एकता कपूर हिचे आभारही व्यक्त केले. अभिनेत्री म्हणाली, ‘नागीन’ मालिका सुरुवातीला 3 महिन्यांसाठी तयार करण्यात आली होती. पण प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रेमामुळे मालिकेचा कालावधी 7 महिने केला…
मौनी रॉय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्री ‘शोटाईम’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. सीरिजमध्ये मौनी हिच्यासोबत, इमरान हाशमी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत होते.
मौनी रॉय हिने अनेक सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत देखील मौनी हिने स्क्रिन शेअर केली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिची चर्चा रंगली आहे.