श्वेता तिवारी 33 वर्षीय अभिनेत्याला करतेय डेट? ‘तो’ व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण

| Updated on: Apr 30, 2024 | 12:31 PM

Shweta Tiwari | दोन घटस्फोटानंतर श्वेता तिवारी हिच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री, वयाच्या 43 व्या वर्षी करतेय 33 वर्षीय अभिनेत्याला करतेय डेट? 'त्या' अभिनेत्याकडून अखेर सत्य समोर..., श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

श्वेता तिवारी 33 वर्षीय अभिनेत्याला करतेय डेट? तो व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
Follow us on

अभिनेता श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका 33 वर्षीय अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ज्या अभिनेत्यासोबत श्वेता हिच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, ‘मेरे डॅड की दुलहन’ फेम फहमान खान आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा अभिनेत्रीचा दुसरा पती अभिनव कोहली याने फहमान आणि श्वेता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेव्हा दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फहमान याने शांत राहण्याच्या निर्णय घेतला. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी तेव्हा रंगणाऱ्या चर्चांकडे फारसं लक्ष दिलम नाही. कारण मला ते फार महत्त्वाचं वाटलं नाही. तेव्हा मी श्वेताच्या एरियामध्ये होतो. म्हणून तिला फोन केला आणि विचारलं घरी आहेस तर भेट म्हणून…’

हे सुद्धा वाचा

 

 

‘मी तिच्या घराखाली उभा होतो. ती देखील घरात असल्यामुळे आली मला भेटण्यासाठी. तेव्हा मी आमचा व्हिडीओ शूट केला. बाकी लोकं काय बोलतात याचा मी कधीच विचार केला नाही. अभिनेता असल्यामुळे माझ्याबद्दल चर्चा रंगणार मला माहिती आहे… ज्यावर मी काहीही स्पष्टीकरण देऊ शकत नाही…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

पुढे अभिनेता श्वेता हिचं कौतुक करत म्हणाला, ‘श्वेता एक उत्तम कलाकार आहे. , ‘मेरे डॅड की दुलहन’ दरम्यान मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे. ती स्वतःच्या सीनसाठी पूर्णपणे तयार असते. हीच महत्त्वाची गोष्ट मला श्वेता हिच्याकडून शिकायला मिळाली आहे. ती माझ्या प्रेरणास्थानी आहे. शिवाय चांगली मैत्रीण सुद्धा…’

यावेळी फहमान याने स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल देखील सांगितलं. अभिनेता म्हणाला, ‘मी देखील रिलेशनशिपमध्ये होतो. पण लॉकडाऊन संपण्याच्या काही दिवसआधी माझं ब्रेकअप झालं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फहमान खान याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री दुसऱ्या घटस्फोटानंतर सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे. श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी हिने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पलक तिवारी देखील आईसारखीच प्रचंड सुंदर दिसते. चाहते देखील पलक हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.