अभिनेत्री श्वेता तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. श्वेता तिवारीने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे श्वेता कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. श्वेता तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा करत स्पष्ट म्हटले होते की, ती आता टीव्ही शोमध्ये काम करणार नाहीये. टीव्ही शोमध्ये काम केल्याने ती तिच्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. शूटिंग लोकेशनही दूर असल्याने आता पूर्वीप्रमाणे या गोष्टी करू शकत नाही.
टीव्ही शोनंतर श्वेता तिवारी हिने आपला मोर्चा हा आता वेब सीरिजकडे वळवला आहे. श्वेता तिवारी ही आता थेट साडीमध्ये सिगारेट ओढताना दिसणार आहे. श्वेता तिवारी ही म्हणाली की, मी धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी वेब सीरिजमध्ये काम करत आहे. त्यात मी डॉनसारखी व्यक्तिरेखा साकारत आहे.
या वेब सीरिजमध्ये मी साडी नेसून सिगारेट ओढत आहे. माझ्यासाठी हे पात्र खूप आव्हानात्मक होते. म्हणूनच मला ते करायचं होतं, असेही श्वेता तिवारी हिने म्हटले आहे. श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. विशेष म्हणजे पलक तिवारी हिने थेट सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.
पहिल्याच चित्रपटात म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश पलक तिवारी हिला मिळाले नाही. श्वेता तिवारी हिने मुलीच्या बॉलिवूड पर्दापणासाठी खूप परिश्रम घेतले. अनेक चित्रपट निर्मात्यांच्या भेटीही श्वेता तिवारी हिने घेतल्या. शेवटी श्वेता तिवारी हिच्या मदतीला सलमान खान हाच धावून आला आणि त्याने पलकला चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
श्वेता तिवारी ही फक्त तिच्या अभिनयासाठीच नाहीतर तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असते. श्वेता तिवारी ही आपल्यापेक्षा तब्बल बारा वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याचे काही सांगितले जातंय. हेच नाहीतर यांचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले, ज्यानंतर ही चर्चा सुरू झाली.