मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केलीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस ओटीटी (Bigg Boss Ott) मधूनच मिळालीये. बिग बाॅसमधून बाहेर पडल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्येही मोठी वाढ झालीये. उर्फी जावेद हिच्यावर नेहमीच तिच्या कपड्यांमुळे जोरदार टिका केली जाते. इतकेच नाही तर तिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.
मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणेच कठीण आहे. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच निर्माण केलीये. सोशल मीडियावर उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ देखील तूफान व्हायरल होताना दिसतात.
उर्फी जावेद हिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून काहीजण घाबरल्याचे देखील दिसतंय. उर्फी जावेद हिने हा व्हिडीओ शेअर करत एक कॅप्शन देखील शेअर केले. मात्र, या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद अतरंगी लूकमध्ये दिसतंय.
उर्फी जावेद हिने चक्क एक्स्ट्रा रिव्हिलिंग आउटफिट कॅरी केलाय. या ड्रेससोबत उर्फी जावेद हिने ब्लॅक लिप लाइनर, गोल्डन ज्वेलरी आणि खतरनाक असा मेकअप केलाय. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही भूतासारखी दिसतंय. हा व्हिडीओ शेअर करत उर्फी जावेद हिने लिहिले की, माझ्या आत असलेल्या सैतानला बाहेर काढण्याचा कॉन्सेप्ट.
आता उर्फी जावेद हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, उगाच सकाळी सकाळी हा व्हिडीओ बघितला. दुसऱ्याने लिहिले की, लहान मुलांना हा व्हिडीओ अजिबात दाखवू नका, ते बिचारे घाबरतील. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.