मुंबई : अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने मोठा काळ बालिवूडमध्ये गाजवलाय. ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षांपासून तशी चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच विदेशात थेट काॅलेजमध्ये जाताना ट्विंकल खन्ना ही दिसली. काॅलेजमधील काही खास फोटो (Photo) शेअर करताना ट्विंकल खन्ना दिसली. ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.
नुकताच ट्विंकल खन्ना हिने आपल्या पर्सनल लाईफबद्दल देखील मोठा खुलासा केलाय. आपल्या विधानांमुळेही ट्विंकल खन्ना ही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने सांगितले की, लाॅकडाऊनच्या काळात तिने तिच्या मुलीला काय खाण्यास दिले आणि स्वयंपाक येत नसल्याने तिला किती जास्त समस्यांना सामोरे जावे लागले.
आता नुकताच ट्विंकल खन्ना हिने एका कॉलममध्ये मोठा खुलासा केलाय. ट्विंकल खन्ना यावेळी तिचा मुलगा आरव याच्याबद्दल भाष्य करताना दिसतंय. ट्विंकल खन्ना म्हणाली की, माझा मुलगा आता मोठा झालाय आणि त्याला त्याची खासगी लाईफ हवीये. ट्विंकल खन्ना म्हणाली की, मी एकदा आरोग्य विमा एजंटशी संपर्क साधला त्यावेळी मी त्यांना माझा मुलगा आरव आणि मुलगी नितारा हे किती वेळा डॉक्टरांकडे गेले हे विचारले.
त्यावेळी मला त्या एजंटने सांगितले की, तुमची मुलगी नितारा ही 11 वर्षांनी असल्याने मी तुम्हाला तिच्याबद्दल माहिती देऊ शकतो. मात्र, तुमचा मुलगा आरव हा 21 वर्षांच्या असल्याने त्याच्याबद्दलची कोणतीही माहिती तुम्हाला शेअर करू शकत नाही. मग मी त्यानंतर आरव याला काॅल केला आणि त्याला अकाउंटचा पासवर्ड मागितला.
आरव याला मी त्याचा पासवर्ड मागणे अजिबात आवडले नाही. तो अत्यंत वेगळ्या प्रकारे माझ्याशी बोलला. तो म्हणाला, मी वर्षभरात फक्त चार वेळा भेटलो आणि हे तुला माहितीये. तिकडे जाण्यासाठी तूच आग्रह केलास. मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे आनंदाने देऊ शकतो पण मी तुला माझा पासवर्ड देणार नाहीये. मी 21 वर्षांचा आहे, 12 वर्षांचा नाही आणि मी माझ्या स्वतःच्या गोष्टी व्यवस्थितपणे हाताळू नक्कीच शकतो.