मुंबई, दि. 11 फेब्रुवारी 2024 | ‘टीव्ही ९ मराठी’चे संपादक उमेश कुमावत यांचे रॅप साँग शुक्रवारी (११ फेब्रुवारी) लॉन्च झाले. मुंबईत ‘टीव्ही ९ मराठी’च्या कार्यालयात ‘थक गया मैं साला’ हे गाणे उत्साहात लॉन्च करण्यात आले. ‘टीव्ही ९’ ग्रुपचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी हे गाणे लॉन्च केले. उमेश कुमावत यांच्या पत्नी हिना कुमावत या गाण्याच्या प्रॉड्यूसर आहेत. कार्यक्रमाला ‘टीव्ही ९ मराठी’चे सहकारी आणि उमेश कुमावत यांचा मित्र परिवार उपस्थित होता. उमेश कुमावत यांचे हे पहिले गाणे https://www.youtube.com/@umeshkumawatsong या युट्यूब चॅनलवर लॉन्च करण्यात आले आहे.
उमेश कुमावत यांच्या गाण्याचा हॅशटॅग #TGMS आहे. म्हणजेच ‘थक गया मैं साला’ होय. रॅप साँग यंग जनरेशनचे गाणे असते. यंग जनरेशनचे रक्त गरम असते. यामुळे या जनरेशनचा शब्द ‘थक गया मैं साला’, असल्याचे उमेश कुमावत यांनी सांगितले. आजच्या युवक-युवतींच्या परिस्थितीपासून प्रेरणा घेऊन आपण हे गाणे लिहिले आहे. आता “व्हॅलेंटाईन डे” अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. त्यापूर्वी हे ब्रेकअप साँग आले आहे. तरुण आणि तरुणींचं नातं आणि त्यांच्या भावभावनांवर हे गाणं आधारित आहे. गाण्याचे चित्रीकरण खंडाळा परिसरात झाले आहे.
गाण्याच्या लॉन्चिंग प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, बातमीदारी करताना आपला छंद जोपासणे गरजेचा आहे. उमेश कुमावत यांनी संपादकपदाची पदाची जबाबदारी सांभाळताना आपला छंद जोपासला. त्यांनी गाणे लिहिले. त्यात अभिनय केला. तसेच गाण्याचे गायकही तेच आहेत. मी उमेश कुमावत यांचे अभिनंदन करतो. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना त्यासाठी मी शुभेच्छा देतो. त्यांनी स्वत:सोबत इतरांचे आयुष्य समुद्ध करावे, हीच सदिच्छा.
गाण्यासंदर्भात बोलताना उमेश कुमावत यांनी म्हटले की, २०-२५ वर्षांपासून गाणे लिहिणे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाले आहे. या गाण्यावर मागील वर्षांपासून काम सुरु केले होते. आज हे गाणे आल्यानंतर संगीत क्षेत्रात काम करण्याच्या माझ्या महत्वाकांक्षेला सुरुवात झाली आहे. नक्कीच हे गाणे येण्यास उशीर झाला, परंतु खूप दिवसांपासून असलेली इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाली, असे उमेश कुमावत यांनी म्हटले.
उमेश कुमावत यांचे ‘थक गया मैं साला’ हे गाणे लॉन्च झाल्यावर लाईकचा पाऊस पडला. अवघ्या दोन तासांत तीन हजारांपेक्षा जास्त जाणांनी लाईक केल्या. अनेकांनी आपल्या कॉमेंट व्यक्त केल्या. गाणे खूप जोरदार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरील युजर्सने दिल्या.