मुंबई : 18 डिसेंबर 2023 | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानातील कराचीमध्ये विषप्रयोग झाल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याला पाकिस्तानातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दाऊदचं बॉलिवूडशी फार जुनं नातं आहे. एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये फक्त दाऊदचाच बोलबाला होता. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. फक्त बॉलिवूडच नव्हे तर क्रीडा विश्वातही त्याचं वर्चस्व पहायला मिळालं होतं. दाऊदसोबत इंडस्ट्रीतल्या कोणत्या अभिनेत्रींचं नाव जोडलं गेलं, ते पाहुयात..
अनिता अयुब- अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचं नाव बॉलिवूडमधल्या बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. अनिता अयुब हे त्यापैकीच एक नाव आहे. या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. असं म्हटलं जातं की प्रसिद्ध चित्रपट निर्माते जावेद सिद्दिकी यांनी अनिताला त्यांच्या चित्रपटात घेण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर दाऊदने जावेद यांची हत्येची सुपारी दिली. अनिता आणि दाऊद यांचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर आहेत.
मंदाकिनी- बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मंदाकिनी. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर तिने संपूर्ण बॉलिवूडवर आपली विशेष छाप सोडली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर दाऊदने मंदाकिनीशीच लग्न करायचं ठरवलं होतं. या दोघांच्या जवळीकची इतकी चर्चा होती की मंदाकिनीला चित्रपटांचे ऑफर्स मिळणंही बंद झालं होतं. दाऊदच्या भीतीपोटी कोणीच तिला काम द्यायला तयार नव्हतं. इतकंच नव्हे तर दाऊद आणि मंदाकिनीने लग्न केल्याचंही म्हटलं जातं. मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाला. दाऊदशी अफेअरनंतर मंदाकिनीचं फिल्मी करिअर संपुष्टात आलं होतं.
पहिल्या चित्रपटातून स्टार झाल्यानंतरही मंदाकिनीला चित्रपटसृष्टीत फारसं यश मिळू शकलं नाही. तिच्या कारकिर्दीत सुमारे 42 चित्रपट केल्यानंतर अचानक मंदाकिनीला चित्रपट मिळणं बंद झालं. मंदाकिनीला दाऊदमुळे अनेक चित्रपटांमध्ये काम मिळालं असलं, तरी ती फार काही कमाल करू शकली नाही.