Actress Connection With Dawood Ibrahim: एककाळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचा फार जवळचा संबंध होता. अनेक सेलिब्रिटींची मैत्री अंडरवर्ल्ड गँगसोबत होती. याच कारणामुळे अनेकांना मोठ्या संकटांचा सामना देखील करावा लागला. शिवाय अंडरवर्ल्डसोबत असलेली मैत्री अनेक सेलिब्रिटींना महागात देखील पडली. एक अभिनेत्री होती, जिला निर्मात्याने सिनेमात कास्ट करण्यासाठी नकार दिला होता. याच कारणामुळे निर्मात्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले होते. या अभिनेत्रीचं नाव अनीता अयूब अलं आहे. अनीता एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे.
अनिता अयूब पाकिस्तान येथील राहणारी आहे. पाकिस्तानात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनिता भारतात मॉडेलिंगसाठी आली होती. मॉडेलिंगमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अनिता हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेते देव आनंद यांच्या ‘प्यार का तराना’ सिनेमातून अनितान बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानतंर अनिता हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनिता हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आणि स्वतःची ओळख निर्माण केली. याच दरम्यान, अनिता आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या नात्याच्या चर्चांनी देखील जोर धरला.
फक्त झगमगत्या विश्वातच नाही तर, चाहत्यांपर्यंत दाऊद आणि अनिता यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. पण अनिता हिने देखील दाऊदसोबत असलेलं नातं मान्य केलं नाही. रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. अशात अनिताची चाहत्यांमध्ये अललेली लोकप्रियता देखील कमी होत होती.
रिपोर्टनुसार, अनिता हिला प्रसिद्ध निर्माते जावेद सिद्दीकी यांनी सिनेमात कास्ट करण्यास नकार दिला. तेव्हा दाऊदने निर्मात्याची हत्या केली.. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डची दहशत वाढली होती. अनिता अन्य गोष्टींमुळे देखील चर्चेत असायची.
अनितावर पाकिस्तानसाठी भारतात हेरगिरी केल्याचा आरोपही होता. एका पाकिस्तानी मासिकात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता. लोकांना वाटतं की अनिता पाकिस्तानची गुप्तहेर आहे. त्यामुळे तिच्यावर बॉलिवूडमधून बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यानंतर अनिता बॉलिवूड सोडून तिच्या मायदेशी पाकिस्तानात गेली. अशी माहिती देखील समोर आली होती.