Aamir Khan Daughter Ira Khan: अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आयरा खान अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर आयरा कायम सक्रिय असते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आयरा तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. आयरा हिने तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल देखील मोठा खुलासा केला होता. शिवाय आई – वडिलांच्या घटस्फोटानंतरच्या दिवसांबद्दल देखील आयराने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं.
आयरा खान हिने लहानपणी आणि तरुण्यात अनेक संकटांचा सामना केलं आहे. ज्यामुळे आमिरच्या लेकीला डिप्रेशनचा सामना करावा लागला. आयरा खान हिने सांगितलं होतं की, तिच्यावर बळजबरी करण्यात आली होती. ज्यांमुळे आयरा काहीही करु शकली नाही. एका मुलाखतीत आयरा म्हणाली होती, ‘जेव्हा मी 3 वर्षांची होती तेव्हा रोज रात्री रडायची आणि स्वतःचं झोपायची…’
‘असं रोज व्हायचं… जेव्हा मी लहान होती तेव्हा आई – वडिलांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 6 व्या वर्षी मी टीबी सारख्या आजाराचा सामना केला….. पुढे जेव्हा मी 14 वर्षांची झाली तेव्हा माझं लैंगिक शोषण झालं. आई – वडिलांच्या घटस्फोटामुळे संपूर्ण आयुष्य बदलून गेलं…’
‘माझं फक्त एकदा लैंगिक शोषण झालं. मी स्वतःला ओझ समजू लागली होती… मी रोज 10 ते 12 झोपलेली असायची… मला जगायचं होतं…’ याच दरम्यान आयरा डिप्रेशनच्या जाळ्यात अडकली. आयरा म्हणाली होती, ‘आज देखील मला याची भीती वाटते…’ असं देखील आयरा म्हणाली होती.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी आयरा कायम नुपूर याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायची. आयरा हिचा पती नुपूर तिच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठा आहे.
आयरा 26 वर्षांची आहे, तर नुपूर 38 वर्षांचा आहे. नुपूर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे. त्याने आमिर, सुश्मिता सेन आणि इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे.
आयरा खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर आयरा खान हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आयरा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील आयराच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.