मुंबई : पाच मे रोजी देशभरात प्रदर्शित झालेला ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा सध्या चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करताना दिसत आहे. अनेक वाद, विरोध झाल्यानंतर ‘द केरळ स्टोरी’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करणाऱ्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला अनेक राज्यांमध्या बॅन देखील करण्यात आलं आहे. सिनेमावरून अनेक प्रकारचं राजकारण होत असल्याचं चित्र देखील समोर येत आहे. अशात केंद्रीय मंत्री इराणी यांनी सिनेमाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांवर टीका केली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाबद्दल स्मृती इराणी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
स्मृती इराणी यांनी ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. स्मृती इराणी म्हणाल्या, ‘जे राजकीय पक्ष सिनेमाला विरोध करत आहेत ते दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे आहेत. मी स्वतः एक आई असल्यामुळे हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते. असे राजकीय पक्ष जे आपल्या देशातील नागरिकांवर होणारे अत्याचार विसरून जातात, दहशतवादी कारस्थानांच्या पाठीशी उभे राहतात… असं आपण समजू शकतो… असं स्मृती इराणी म्हणाल्या…
‘द केरळ स्टोरी’ सिनेमा पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री दिल्लीतील चाणक्यपुरी येथील चित्रपटगृहात पोहोचल्या होत्या. अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमाची चर्चा सध्या तुफान रंगत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तुफान चर्चा रंगली. शिवाय सिनेमाला विरोध देखील करण्यात आला. अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रदर्शन देखील रोकण्यात आलं.
एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली. त्यांनी बंदी घोषित केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. पण होणाऱ्या वादाचा कोणताही परिणाम सिनेमावर झाला नाही. आजही अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. पण तरी देखील बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई करताना दिसत आहे.
‘द केरळ स्टोरी’ सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने 8 कोटींची कमाई केली. सिनेमाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण 35 कोटींची कमाई केली. सोमवारी सिनेमाने तब्बल जवळपास ११ कोटींची कमाई केली, ज्यामुळे सिनेमाचं कलेक्शन 46 कोटी रुपयांवर पोहोचलं. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने रिलीजच्या पाचव्या दिवशी ११ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. अशा प्रकारे सिनेमा ५ दिवसात ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.