मुंबई : उर्फी जावेद हिने एक अत्यंत मोठा काळ हा टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने आपल्या करिअरची सुरूवातच टीव्ही मालिकांपासून केलीये. आपल्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका तिने केल्या. मात्र, म्हणावी तशी संधी ही उर्फी जावेद हिला मालिकांमध्ये मिळाली नाही. आपले अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्याठी उर्फी जावेद हिने काही वर्षांपूर्वीच मुंबई (Mumbai) गाठली. मात्र, मालिकांमध्ये मुख्य अभिनेत्रीसाठी तिला कधी संधी मिळाली नाही.
उर्फी जावेद हिने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एक मोठा संघर्ष केला. इतकेच नाही तर चक्क मुंबईच्या रस्त्यांवर झोपण्याची वेळ तिच्यावर आली. अनेकदा उर्फी जावेद ही मुलाखतीमध्ये थेट सांगते की, तिला तिचे वडील बेशुद्ध पडेपर्यंत मारत असत. उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची असून तिने काही वर्षांपूर्वीच मुंबई गाठली. त्यावेळी तिच्याकडे मुंबईत राहण्यासाठी घर देखील नव्हते.
उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे जोरदार टिका कायमच केली जाते. फक्त टिकाच नाही तर आतापर्यंत अनेकदा उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याची धमकी देखील मिळालीये. मात्र, या धमक्यांचा काही परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. फक्त लोकच नाही तर काही बाॅलिवूड कलाकार आणि टीव्ही कलाकार हे देखील उर्फी जावेद हिच्यावर टिका करताना दिसतात.
उर्फी जावेद हिच्यावर टीव्ही अभिनेत्री कश्मीरा शाह हिने मोठी टिका केली. या टिकेला जोरदार उत्तर देताना उर्फी जावेद दिसली. इतकेच नाही तर दोघींमधील वाद इतका जास्त वाढला होता की, सतत या सोशल मीडियावर एकमेकींच्या विरोधात पोस्ट शेअर करत होत्या. यांचा वाद इतका टोकाला गेला की, कश्मीरा शाह हिचे जुने फोटो शेअर करताना उर्फी जावेद दिसली.
कश्मीरा शाह आणि उर्फी जावेद या एकमेकींना अजिबात बोलत देखील नाहीत. फक्त कश्मीरा शाह हिच नाही तर काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर यानेही उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर टिका केली. ज्यानंतर रणबीर कपूर याला देखील खडेबोल सुनावताना त्यावेळी उर्फी जावेद ही दिसली. उर्फी जावेद हिला काही दिवसांपूर्वीच एका ब्रोकरने थेट जीवे मारण्याची धमकी दिली.