मुंबई : शिल्पा शेट्टी हिचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) हा मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसतंय. राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर आरोप झाले. राज कुंद्रा हा बिग बाॅस 17 (Bigg Boss 17) मध्ये देखील सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. राज कुंद्रा हा बिग बाॅस 17 मध्ये ऐकून काही मोठे खुलासे करण्याची देखील दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर बिग बाॅस 17 च्या निर्मात्यांनी राज कुंद्रा याच्यासोबत संपर्क साधल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
सध्या सोशल मीडियावर राज कुंद्रा याचा स्टॅंड अप कॉमेडीचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये काही मोठे खुलासे करताना राज कुंद्रा दिसला. इतकेच नाही तर यामध्ये त्याने थेट उर्फी जावेद हिचे नाव घेत स्वत: ची आणि तिची खिल्ली उडवली. यावेळी उपस्थित लोक टाळ्या वाजवताना देखील दिसले.
राज कुंद्रा याचे हे बोलणे उर्फी जावेद हिला अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसतंय. उर्फी जावेद हिने आता राज कुंद्रा याच्या बोलण्याचा चांगलाच समाचार घेतल्याचे स्पष्ट दिसतंय. उर्फी जावेद हिने राज कुंद्रा याचा तो स्टॅंड अप कॉमेडीचा व्हिडीओ शेअर इंस्टा स्टोरीला करत शिल्पा शेट्टीच्या पतीला खडेबोल सुनावले.
उर्फी जावेद ही म्हणाली की, दुसर्यांचे कपडे काढून पैसे कमवणारा आता माझ्या कपड्यांवर कमेंट करतोय. सॉरी नाॅट साॅरी पॉर्न किंग… म्हणजेच काय तर शिल्पा शेट्टी हिच्या पतीला उर्फी जावेद हिने थेट पॉर्न किंग म्हटले. आता राज कुंद्रा याला उर्फी जावेद हिच्यावर कमेंट करणे अत्यंत महागात पडल्याचे स्पष्ट दिसतंय.
उर्फी जावेद हिचा सपोर्ट करताना अनेकजण दिसत आहेत. राज कुंद्रा याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले होते की, पापाराझी हे फक्त मी काय कपडे घातले आणि उर्फी जावेद हिने काय कपडे नाही घातले यावर नजर ठेवतात. मात्र, राज कुंद्राचे हे बोलणे उर्फी जावेद हिला अजिबातच पटले नसल्याचे दिसतंय. आता राज कुंद्रा याच्या विधानाची विविध चर्चा रंगताना दिसत आहे.