मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख ही नक्कीच निर्माण केलीये. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. अनेक मोठ्या मालिकांमध्ये काम करण्याची संधी ही उर्फी जावेद हिला मिळालीये. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधूनच मिळालीये. बिग बाॅस ओटीटीची विजेती जरी उर्फी जावेद झाली नसली तरी बिग बाॅसच्या घरात धमाका करताना उर्फी जावेद ही दिसली होती. उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे.
उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी सतत काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिच्या बोल्ड फोटोने कायमच इंटरनेटचा पारा देखील वाढतो. मुळात म्हणजे उर्फी जावेद कधीच काय घालेल याचा नेम नाही.
अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. मात्र, या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबात होत नाही. उर्फी जावेद नेहमीच अतरंगी लूकमध्ये दिसते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने चक्क टाॅयलेट पेपरचा ड्रेस तयार करून घालता होता. ज्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला.
नुकताच उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलेला दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरूवातीला उर्फी जावेद ही शांत बसून चहा पिताना दिसल आहे. मात्र, चहा पित असताना तिच्या मनात काहीतरी विचार येतो. त्यानंतर थेट टी बॅगपासून ड्रेस तयार करून उर्फी जावेद घालताना दिसत आहे. म्हणजे आता टी बॅगच्या ड्रेसमध्ये उर्फी जावेद दिसत आहे.
पुढे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले की, त्या टी बॅग ड्रेसवर गरम पाणी टाकले जाते तर त्या ड्रेसचा रंग हा चहा सारखा होतो. आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत थेट म्हटले की, डायपरचा ड्रेस राहिला आहे, कधी तयार करणार मग उर्फी.