मुंबई : उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे थेट बलात्कार करून जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या आहेत. मात्र, मिळणाऱ्या धमक्यांचा फार काही परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. सोशल मीडियावर (Social media) उर्फी जावेद ही नेहमीच सक्रिय असते. उर्फी जावेद ही आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो आणि व्हिडीओ (Video) देखील शेअर करते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिच्या कपड्यांच्या विरोधात महिला या रस्त्यावर उतरल्या होत्या. इंदूरमध्ये महिलांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाची जोरदार चर्चा ही सोशल मीडियावर बघायला मिळाली.
नुकताच उर्फी जावेद हिने इंस्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. या व्हिडीओमध्ये सर्वात अगोदर उर्फी जावेद ही एका मोठ्या झाडाजवळ दिसत असून ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर थेट एका खास ड्रेसमध्ये उर्फी जावेद ही दिसत आहे.
विशेष म्हणजे उर्फी जावेद ज्या ड्रेसमध्ये दिसत आहे तो ड्रेस हा झाडाच्या सालापासून तयार करण्यात आलाय. उर्फी जावेद ही कधी कशापासून तयार करून कपडे घालेल याचा अजिबातच अंदाजा लावता येत नाही. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी स्टाईलमध्ये दिसते. आता उर्फी जावेद हिने शेअर केलेला व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
उर्फी जावेद हिने हा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, हा ड्रेस तयार करण्यासाठी कोणत्याही झाडाचे नुकसान अतिबात करण्यात आले नाहीये. उर्फी जावेद हिचा हा लूक काही लोकांना आवडल्याचे दिसत आहे. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, उर्फी जावेद ही कशापासून ड्रेस तयार करेल याचा अजिबातच अंदाजा नाही.
अजून एकाने लिहिले की, उर्फी जावेद हिच्या डोक्यामध्ये या सर्व गोष्टी नेमक्या कुठून येतात, हेच मला मुळात कळत नाही. उर्फी जावेद हिच्या नव्या लूकच्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट या केल्या जात आहेत. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. अनेकदा उर्फी जावेद हिच्यावर टिका देखील केली जाते. आता या व्हिडीओ व्हिडीओमुळे तिला अनेकांनी खडेबोल सुनावण्यासही सुरूवात केलीये.