मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कधी काय घालेल याचा अजिताबच नेम नाहीये. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील दिल्या जातात. मात्र, असे असताना देखील नेहमीच उर्फी जावेद ही अतरंगी स्टाईलमध्ये दिसते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने चक्क झाडाच्या सालीपासून एक ड्रेस (Dress) तयार करून घातला होता. उर्फी जावेद हिचा हा ड्रेस पाहून अनेकांना धक्का बसला. बऱ्याच लोकांनी थेट उर्फी जावेद हिने झाडाच्या सालीपासून नाही तर चक्क शेणापासून तयार केलेला ड्रेस घातला म्हणत तिला टार्गेट (Target) केले होते.
नुकताच उर्फी जावेद हिने तिच्या नव्या लूकमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले असून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. या व्हिडीओनंतर उर्फी जावेद हिच्यावर टिका ही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अनेकांनी उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावण्यासही सुरूवात केली आहे.
उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत थेट उर्फी जावेद ही कधीच सुधारणार नाही असे देखील म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने फक्त पँट घातलेली दिसत आहे आणि तिचे ब्रेस्ट प्लास्टिकच्या हातांनी झाकलेले आहेत. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिने पँटचे बटण आणि अर्धी चेन ही उघडी ठेवली आहे.
उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, शेमलेस. दुसऱ्याने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, मुलींना हे पाहून लाज वाटली पाहिजे. तिसऱ्याने लिहिले की, ही उर्फी जावेद नेमकी कशासाठी कपडे घालते? हिला असेही अंग प्रदर्शन करायचे असते. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादात अडकते.
आता या व्हिडीओमुळे उर्फी जावेद हिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका ही केली जात आहे. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरची सुरूवात की टीव्ही मालिकांनी केलीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळखी ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिचे सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.