मुंबई : उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. इतकेच नाही तर उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वी मोठा खुलासा केला. उर्फी जावेद हिने सांगितले की, तिचे वडील तिला कायमच मारहाण करत असत. बऱ्याच वेळा ती बेशुद्ध देखील व्हायची. उर्फी जावेद हिने काही वर्षांपूर्वीच मुंबई गाठलीये. उर्फी जावेद हिने मुंबईमध्ये आल्यावर एक मोठा संघर्ष नक्कीच केलाय. रस्त्यावर झोपण्याची वेळ देखील उर्फी जावेद हिच्यावर आली.
उर्फी जावेद हिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. उर्फी जावेद ही या व्हिडीओमध्ये तिच्या नव्या लूकमध्ये दिसतंय. इतकेच नाही तर थेट कॅमेऱ्यासमोर दोन वेगवेगळ्या ड्रेसमध्ये उर्फी जावेद ही दिसलीये. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
उर्फी जावेद हिने पहिल्यांदा ब्लॅक नेट ड्रेस घातला होता, हा ड्रेस वायर्ड प्रोटेक्शन लुकमध्ये डिझाइन करण्यात आला. इतकेच नाही तर यामध्ये उर्फी जावेद हिचा चेहरा दिसत नव्हता. त्यानंतर अचानकच उर्फी जावेद बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते. आता उर्फी जावेद हिचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.
उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसतायंत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, आता मला उर्फी जावेद हिचे काैतुक करण्यासाठी शब्दच मिळत नाहीयेत. दुसऱ्याने लिहिले की, मला उर्फी जावेद पहिल्यांदा आवडलीये. तिसऱ्याने लिहिले की, अरे वा उर्फी जावेदमध्ये मोठी सुधारणा झालीये.