Urfi Javed Car : मॉडेल उर्फी जावेद (Uorfi Javed) कायम तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या कपड्यांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. उर्फी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. उर्फीची फॅशन काही लोकांना अवडते. तर काही जण मात्र उर्फीच्या फॅशनच्या विरोधात असतात. पण आता उर्फी तिच्या फॅशनमुळे नाही तर, एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. आता उर्फीने नवीन कार खरेदी केली आहे. ज्यामुळे मॉडेल तुफान चर्चेत आली आहे. उर्फीच्या कलेक्शनमध्ये आता दोन कार झाल्या आहेत.
उर्फीने नुकताच नव्या SUV चं स्वागत केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र उर्फीची चर्चा रंगताना दिसत आहे. उर्फीच्या नव्या कारची किंमत ३५ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. नवी कार खरेदी केल्यामुळे उर्फी प्रचंड आनंदी झाली आहे. तर नवीन कार खरेदी करण्यामागे असलेलं खास कारण देखील उर्फीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
नवीन कार खरेदी केल्यानंतर उर्फी म्हणाली, ‘ही माझी दुसरी कार आहे. मी कार माझ्या टीमसाठी खरेदी केली आहे. कारण शुटिंगच्या ठिकाणी माझी टीम माझ्यामागे रिक्षाने धावपळ करत यायचे. आता खरेदी केलेली कार पहिल्या कारपेक्षा मोठी आहे. माझे मॅनेजर, मेकअप आर्टटिस्ट बाउंसर प्रत्येक जण या कारमध्ये बसू शकतो.’ असं उर्फी म्हणाली.
सध्या सर्वत्र उर्फी आणि उर्फीच्या नव्या कारची चर्चा रंगत आहे. कायम विचित्र ड्रेस घालून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उर्फीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेली उर्फी फक्त २४ वर्षांची आहे. बिग बॉस ओटीटीनंतर देखील उर्फीला यश मिळालं नाही, पण ती चर्चेत आली. सर्वत्र तिच्या फॅशनची चर्चा झाली.
पुढे तिची फॅशनच उर्फीची ओळख बनली. मीडियारिपोर्टनुसार उर्फीची संपत्ती दीडशे कोटींपेक्षा अधिक आहे. उर्फी दर महिन्याला २ ते ५ मिलियन कमाई करते. मुंबईतील तिच्या आलिशान फ्लॅट आणि महागड्या गाडीची कायम चर्चा होत असते. आयुष्यात आलेल्या संघर्षानंतर उर्फीने कमी वयात आणि कमी कालावधीत मुंबईमध्ये नाव आणि कोट्यवधींची माया कमावली.
उर्फी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. उर्फी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.