मुंबई : मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या अटकेची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामधील सर्वत्र चर्चाचा विषय आहे. ‘उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही?;’ अशी टीका करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ऊर्फीच्या अटकेची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांच्या ट्विटनंतर उर्फीने देखील त्यांनी सडेतोड इत्तर दिलं. आता चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातिला वाद शमण्याचं नाव घेत नाही. आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेली उर्फी नक्की आहे तरी कोण, मॉडेल कडे किती संपत्ती आहे? याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. तर आज जाणून घेवू उर्फी नक्की कोण आहे. (Chitra Wagh objection on Urfi Javed)
उर्फी मुळची उत्तर प्रदेशच्या लाखनऊ येथील आहे. विचित्र ड्रेस घालून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उर्फीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेली उर्फी फक्त २४ वर्षांची आहे. पण झगमगत्या विश्वात येण्याआधी उर्फी आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. कमी वयात उर्फीच्या खांद्यावर आई आणि लहान बहिणींची जबाबदारी आली.
उर्फीला दोन बहिणी आहेत. आई-वडिलांचं पटत नसल्यामुळे उर्फी कायम घरा बाहेर पडण्याचा विचार करायची. वडील सतत शिव्या द्यायचे. सतत होणाऱ्या भाडणांमुळे घरी राहूच नये असं उर्फीला कायम वाटायचं. उर्फी मोठी झाल्यानंतर घराबाहेर निघाली सोबत तिची बहिण देखील निघाली, वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यामुळे आई आणि बहिणीची पूर्ण जबाबदारी उर्फीवर पडली.
फार कमी वयात उर्फीने अनेक वाईट गोष्टी आणि संघर्ष पाहिला. १९९७ साली जन्मलेल्या उर्फीने त्यानंतर मुंबई गाठली. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी छोट्या मोठ्या भूमिका मिळवल्या. पण उर्फीला प्रसिद्धी मिळाली नाही. पण उर्फी बिग बॉस ओटीटीमुळे प्रकाशझोतात आली.
बिग बॉस ओटीटीनंतर देखील उर्फीला यश मिळालं नाही, पण ती चर्चेत आली. सर्वत्र तिच्या फॅशनची चर्चा झाली. पुढे तिची फॅशनच उर्फीची ओळख बनली. मीडियारिपोर्टनुसार उर्फीची संपत्ती दीडशे कोटींपेक्षा अधिक आहे. उर्फी दर महिन्याला २ ते ५ मिलियन कमाई करते. मुंबईतील तिच्या आलिशान फ्लॅट आणि महागड्या गाडीची कायम चर्चा होत असते.
आयुष्यात आलेल्या संघर्षानंतर उर्फीने कमी वयात आणि कमी कालावधीत मुंबईमध्ये नाव आणि कोट्यवधींची माया कमावली. पण आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत असलेला वाद उर्फीला कुठे घेवून जाईल सांगता येत नाही. चित्रा वाघ यांच्याकडून होत असलेल्या टीकेला उर्फी देखील सडेतोड उत्तर देत आहे.