मॉडेल उर्फी जावेद आणि ऑरी यांनी शुक्रवारी संध्याकाळी एकत्र स्पॉट करण्यात आलं. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. उर्फी आणि ऑरी यांना एकत्र पाहिल्यानंतर पापाराझींनी दोघांभोवती गर्दी केली. तेव्हा उर्फी आणि ऑरी यांनी सर्वांसमोर एकमेकांना किस केलं. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, नेटकरी व्हायरल व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहे.
ऑरी – उर्फी यांनी एकमेकांना किस केल्यानंतर पापाराझींनी ऑरी याला उर्फीसोबत लग्न करणार का असा प्रश्न विचारला… यावर होकार देत ऑरी म्हणाला, ‘का नाही करणार…’, याआधी उर्फीला देखील लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. सांगायचं झालं, ऑरी – उर्फी एकमेकांचे चांगले मित्र आहे. दोघांमध्ये रंगत असलेल्या लग्नाच्या चर्चा फक्त विनोद असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
‘उर्फी हिला लग्न करायचं असेल तर, मी नक्की लग्नासाठी तयार आहे…’ असं देखील ऑरी म्हणताना दिसला. याआधी देखील ऑरी आणि उर्फी यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
आता व्हायरल होत असलेल्या दोघांच्या व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘दोघे एकत्र किती चांगले दिसत आहेत…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जोडी नं 1’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मेड फॉर इच अदर…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘देवाने प्रत्येकासाठी कोणालातरी बनवलं आहे… यावर आज विश्वास बसला…’ सध्या सर्वत्र ऑरी आणि उर्फी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
ऑरी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ओरहान अवात्रामणी उर्फ ऑरी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेल्यांपैकी एक आहे. कोणत्याही सेलिब्रिटीने पार्टी किंवा इतर कोणत्या गोष्टीचं आयोजन केसं असेल तर ऑरी त्याठिकाणी असतोच… शिवाय सेलिब्रिटींसोबत स्वतःच्या सिग्नेचर पोजमध्ये काढत असलेल्या फोटोंमुळे देखील ऑरी कायम चर्चेत असतो.
उर्फी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मालिकांमध्ये उर्फी हिने छोट्या भूमिका साकारल्या. बिग बॉस ओटीटीमध्ये देखील उर्फी स्पर्धक म्हणून सामिल होती. पण अभिनेत्री लोकप्रियता मिळाली नाही. स्वतःच्या फॅशनमुळेच उर्फी प्रसिद्धी झोतात आली. सोशल मीडियावर देखील उर्फी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.