Adipurush | ‘आदिपुरुष’बद्दल आता उर्फी जावेदसुद्धा स्पष्टच बोलली; म्हणाली “हनुमानजींचे डायलॉग्स ऐकून..”

| Updated on: Jun 26, 2023 | 9:50 AM

रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया, श्रीरामाच्या भूमिकेतील अरुण गोविल आणि लक्ष्मणाच्या भूमिकेतील सुनील लहरी यांनीसुद्धा 'आदिपुरुष' चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.

Adipurush | आदिपुरुषबद्दल आता उर्फी जावेदसुद्धा स्पष्टच बोलली; म्हणाली हनुमानजींचे डायलॉग्स ऐकून..
Urfi Javed reaction on Adipurush
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. शिवाय प्रभास, क्रिती सनॉन, सैफ अली खान यांसारख्या कलाकारांकडून रामायणाची कथा कशी साकारली जाईल, हे अनेकांना पाहायचं होतं. ‘आदिपुरुष’ जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा मात्र प्रेक्षकांची निराशा झाली. ‘रामायण’ कसं दाखवू नये, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘आदिपुरुष’ अशी टिप्पणी अनेकांकडून झाली. सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच विविध सेलिब्रिटींनीही या चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्सवर आक्षेप नोंदविला आहे. आता अभिनेत्री उर्फी जावेदची ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाली उर्फी?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘आदिपुरुष’ या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना उर्फी म्हणाली, “मी आदिपुरुष अद्याप पाहिला नाही मात्र रिल्समध्ये चित्रपटाचे विविध व्हिडीओ पाहिले आहेत. चित्रपट पाहिला नाही त्यामुळे मी फार काही बोलू शकत नाही. पण जे काही डायलॉग्स पाहिले, ते पाहून हाच प्रश्न पडला की हनुमानजी असं कसं बोलू शकतात? माझ्या मते सर्वांत चांगलं रामायण तेच होतं, जे मी लहानपणी पाहिलं होतं. मला असं वाटतं की ते सर्वांनीच पाहिलं असेल. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो किंवा ख्रिश्चन.. प्रत्येकाने ते एकदा तरी पाहिलंच असेल. त्या रामायणाची छवी मनात अशा पद्धतीने बनली आहे की त्याची तुलना कोणाशीच केली जाऊ शकत नाही.”

‘आदिपुरुष’ या चित्रपटाची तुलना रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेशी सातत्याने केली जात आहे. रामायण या मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया, श्रीरामाच्या भूमिकेतील अरुण गोविल आणि लक्ष्मणाच्या भूमिकेतील सुनील लहरी यांनीसुद्धा ‘आदिपुरुष’ चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. याशिवाय ‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनीसुद्धा ‘आदिपुरुष’वर कठोर शब्दांत टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘आदिपुरुष’ची कमाई-

पहिला दिवस- 86.75 कोटी रुपये
दुसरा दिवस- 65.25 कोटी रुपये
तिसरा दिवस- 69.01 कोटी रुपये
चौथा दिवस- 16 कोटी रुपये
पाचवा दिवस- 10.07 कोटी रुपये
सहावा दिवस- 7.25 कोटी रुपये
सातवा दिवस- 4.85 कोटी रुपये
आठवा दिवस- 3.40 कोटी रुपये
नववा दिवस- 5.25 कोटी रुपये
एकूण- 268.55 कोटी रुपये