मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. अत्यंत कमी वेळामध्ये तिने खास ओळख नक्कीच मिळवलीये. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ लोकांना आवडल्याचे देखील बघायला मिळतंय. उर्फी जावेद ही या व्हिडीओमध्ये जबरदस्त अशा लूकमध्ये आहे.
नुकताच पापाराझी यांना खास पोझ देताना उर्फी जावेद ही दिसलीये. विशेष म्हणजे नेहमीच अतरंगी कपड्यांमध्ये असलेली उर्फी जावेद ही चक्क पंजाबी सूटमध्ये दिसलीये. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिचा आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी जावेद हिला बघताच पापाराझी हे म्हणाले, अरे आज तर एकदम पंजाबी लूकमध्ये…अरे पंजाबी लूक नाही हा…हा मुस्लिममध्ये घातला जातो शरारा सूट…उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. काहींनी तर उर्फी जावेद हिचे थेट काैतुक केल्याचे बघायला मिळतंय.
एकाने लिहिले की, उर्फी जावेद या लूकमध्ये चांगली दिसत आहे, आजपर्यंतचा हिचा मला हाच व्हिडीओ आवडला. दुसऱ्याने लिहिले की, पंजाबी सूटमध्ये जबरदस्त उर्फी दिसत आहे. तिसऱ्याने लिहिले की, दररोज असेच कपडे घालत जा. अजून एकाने लिहिले की, शेवटी हिला अक्कल आल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर कमेंट केल्या जात आहेत.
उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिच्यावर टिका मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, उर्फी जावेद हिच्यावर होणाऱ्या टिकेचा अजिबातच परिणाम होत नाही. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच एक फेक व्हिडीओ तयार केला. ज्यानंतर थेट मुंबई पोलिसांनी तिच्यावर कारवाईच केली.