आत्महत्येसंदर्भात उर्फी हिचं नवीन ट्विट; नेटकऱ्यांमध्ये खळबळ

| Updated on: Jan 17, 2023 | 2:41 PM

कायम तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेद हिचं खळबळजनक ट्विट; आत्महत्येसंदर्भात ट्विट केल्यामुळे मॉडेल तुफान चर्चेत

आत्महत्येसंदर्भात उर्फी हिचं नवीन ट्विट; नेटकऱ्यांमध्ये खळबळ
आत्महत्येसंदर्भात उर्फी हिचं नवीन ट्विट; नेटकऱ्यांमध्ये खळबळ
Follow us on

मुंबई : मॉडेल उर्फी जावेद कायम तोकड्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते सोशल मीडियावर उर्फी हिला फॉलो करणाऱ्या युजर्सची संख्या देखील फार मोठी आहे. उर्फी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. पण गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी हिच्या कपड्यांवर आक्षेप घेत मॉडेलच्या अटकेची मागणी केली. याप्रकरणानंतर सोशल मीडियावर उर्फी हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. सध्या उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील वाद टोकाला पोहोचला आहे.

चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतल्यानंतर उर्फीने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. शिवाय जीवाला धोका असल्याचं सांगत उर्फीने महिला आयोगाच्या आध्यक्षा रुपाला चाकणकर यांच्याकडे सुरक्षेची मागणी देखील केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांमूळे उर्फी तिच्या ट्विटमुळे देखील चर्चेत आहे.

आता देखील उर्फी हिने एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये उर्फीने आत्महत्येचा उल्लेख केला आहे. उर्फी ट्विट करत म्हणाली, ‘आत्महत्या करण्यासाठी आयुष्य प्रचंड लहान आहे. संयम बाळगा वेळ आल्यावर आयुष्य संपेल…’ उर्फीच्या ट्विटनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.

 

 

ट्विटनंतर उर्फी तुफान चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फी तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत अटकेची मागणी केली. याप्रकरणी उर्फीची शनिवारी पोलीस चौकशी देखील झाली.

चित्रा वाघ यांचा उर्फीच्या कपड्यांना विरोध
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. ‘उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फी हिचा तोकड्या कपड्यांमुळे विरोध केला.

काही दिवसांपूर्वी एक ट्विट करत चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, असं म्हणत उर्फीच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर उर्फीने देखील चित्रा वाघ यांच्या ट्विटरच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं. एवढंच नाही, तर मॉडेलने चित्रा वाघ यांना ट्विट करत डिवचण्याचा प्रयत्न केला. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.