अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचं नाव अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्रीचं नातं कोणत्याचं सेलिब्रिटीसोबत लग्नापर्यंत पोहोचंल नाही. अखेर अभिनेत्रीने स्वतःपेक्षा 10 वर्ष लहान अभिनेता आणि उद्योजक मोहसिन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केलं. पण गेल्या काही दिवसांपासून मोहसिन अख्तर मीर आणि उर्मिला मातोंडकर यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर दोघांना देखील अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
मोहसिन अख्तर मीर आणि उर्मिला यांचा घटस्फोट होणार की नाही… यावर अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, सोशल मीडियावर अभिनेत्रीचे जुने व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे.
सध्या उर्मिलाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री तरुणींना सल्ला देताना दिसत आहे. आधी स्वतःची ओळख निर्माण करा, त्यानंतर बॉयफ्रेंड यांसारख्या अन्य गोष्टींवर लक्ष द्या… असं अभिनेत्री तरुणींना सांगताना दिसत आहे.
उर्मिला म्हणाली, ‘तुम्ही किती कूल आणि तुमच्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी घडत आहेत… याचा विचार करण्यासाठी बॉयफ्रेंडची गरज नाही. स्वतःचं आयुष्य एक्सप्लोर करा. आयुष्यात बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. आताच्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे जग फार जवळ आलं आहे. काही तरी नवीन करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.’
‘सर्वात आधी तुम्ही काय आणि कसं करु शकता याकडे लक्ष द्या… नवरा, मुलं… या सर्व गोष्टी देखील आयुष्यात महत्त्वाच्या आहेतच. पण सर्वात आधी आपण कोण आणि कसे आहोत… हे ओळखणं देखील तरुणींसाठी तितकंच महत्त्वाचं आहे.’ असं अभिनेत्री तरुणींना म्हणाली. उर्मिलाच्या व्हिडीओवर अनेक जण लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
लवकरच ‘बिग बॉस 18’ शो सुरु होणार आहे. रिपोर्टनुसार, अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस 18’ शोमध्ये उर्मिला मातोंडकर सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस 18’ सिझन 6 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होणार आहे. शोमध्ये होस्टच्या भूमिकेत सलमान खान याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.