Urmila Matondkar – Mohsin Akhtar Mir: अभिनेत्री उर्मिला मतोंडकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने देखील पती मोहसिन अख्तर मीर (Mohsin Akhtar Mir) याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्मिलाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. पण यामागचं नक्की कारण अद्याप समोर आलेलं नाही.
उर्मिला आणि मोहसिन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे तर, दुसरीकडे मोहसिन याने सोशल मीडियावर एका लक्षवेधी पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर देखील मोहसिन याची पोस्ट व्हायरल होत आहे. मोहसिन याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे.
घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना मोहसिने सोशल मीडिया इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘पेड पीआर आणि खोट्या बातम्या सत्य बदलू शकत नाहीत.’ सध्या सर्वत्र त्याच्या पोस्टची चर्चा सुरु आहे. मोहसिन याने केलेल्या पोस्टनंतर नक्की सत्य काय? असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे.
सांगायचं झालं तर, मोहसिन आणि उर्मिला यांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलो केलं आहे. मोहसिन आणि उर्मिला यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण आता लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
जवळपास 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांनी 4 फेब्रुवारी 2016 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांच्या लग्नाची चर्चा देखील तुफान रंगली आहे. कारण उर्मिला हिंदू तर मोहसिन अख्तर मीर आहे… एवढंच नाही तर, दोघांमध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. उर्मिला तिच्या नवऱ्यापेक्षा 10 वर्ष मोठी आहे.
रिपोर्टनुसार, उर्मिला आणि मोहसिन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सर्वत्र जोर धरत आहे. पण दोघांनी देखील रंगणाऱ्या चर्चांवर अधिकृत घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर देखील दोघांनी कोणती पोस्ट करत घटस्फोट झाल्याची घोषणा केलेली नाही.