मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये चित्रविचित्र फॅशनचा ट्रेंडच आला आहे. एकीकडे उर्फी जावेद तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. तर दुसरीकडे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा त्याच्या विचित्र फेस मास्कमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो. यात आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची भर पडली आहे. या अभिनेत्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नुकतीच ही अभिनेत्री मुंबईच्या रस्त्यावर अजब लूकमध्ये फिरताना दिसली. या अभिनेत्रीने फ्लोरल नाईट ड्रेस घातला होता. आणि चेहऱ्यावर सोनेरी रंगाचा मास्क लावला होता. या मास्कने तिचा पूर्ण चेहरा झाकलेला होता. मात्र अशा लूकमध्येही तिने पापराझीसमोर फोटोसाठी बिनधास्त पोझ दिले. फेस मास्क तसाच लावून बाहेर हिंडणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडू लागला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. हिने राज कुंद्रापासून प्रेरणा घेतली वाटतं, असं एकाने लिहिलंय. तर कोण आहे ही? राज कुंद्राची बहीण तर नाही ना? असा उपरोधिक सवाल दुसऱ्या युजरने केला. कमेंट सेक्शनमध्ये काहींनी तिला अचूक ओळखलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून उर्वशी रौतेला आहे. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ती काहीही करू शकते, अशीही टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे.
उर्वशीने मॉडेलिंग विश्वात चांगलंच नाव कमावलं आहे. मात्र बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिला फारशा भूमिका मिळाल्या नाहीत. मात्र उर्वशी तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंत सोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. या दोघांमध्ये सोशल मीडियावर चांगलाच वाद झाला होता.
या दोघांमधील लव्ह-हेट रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलं तरी नेटकरी त्याची लिंक ऋषभ पंतशी जोडण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नव्हे तर कार्यक्रमांमध्येही उर्वशीसमोर चाहते ऋषभच्या नावाचा जयघोष करत असतात. असे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे.