Zakir Hussain Net Worth: तबल्याच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद झाकिर हुसैन यांनी सोमवारी अखेरचा श्वस घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून झगमगत्या विश्वात शोककळा पसरली आहे. तब्येतीच्या समस्येमुळे त्यांना काही काळ अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र 16 डिसेंबर रोजी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
झाकिर हुसैन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, तबला वादन त्यांना वडिलांनी शिकवलं होतं. अनेक पुरस्कार देखली त्यांनी स्वतःच्या नावावर केले होते. लहानपणीत त्यांनी तबल्यावर ठेका धरला आहे जगभरातील संगीतप्रेमींच्या मनावर राज्य केलं. पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते झाकीर हुसेन यांनी कोट्यवधींची संपत्ती कुटुंबियांसाठी मागे ठेवली आहे. त्यांनी अमेरिकेपासून युरोपपर्यंत सगळ्यांना तबल्याचं वेड लावलं होतं.
वडिलांकडून तबला वादनाचे धडे गिरवल्यानंतर आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर झाकिर हुसैन यांनी कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी झाकिर हुसैन यांनी अमेरिका येथे पहिल्यांदा सादरीकरण केलं. ज्यासाठी त्यांना फक्त 5 रुपये मिळाले होते. रिपोर्टनुसार, छोट्या सुरुवातीनंतर झाकिर हुसैन हे नाव जगभरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालं. मिळालेल्या माहितीनुसार, झाकिर हुसैन एका कँन्सर्टसाठी 5 – 10 लाख रुपये मानधन घ्यायचे.
झाकिर हुसेन यांनी अंदाजे एकूण संपत्ती सुमारे 1 मिलियन डॉलर असल्याचे सांगितलं जात आहे. 1 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 8.48 कोटी रुपये… तबला वादनाच्या मैफिलींबरोबरच इतर स्रोतांमधूनही त्यांची कमाई व्हायची. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी 1973 मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला, जो खूप लोकप्रिय झाला.
दिवंगत तबवा वादक झाकिर हुसैन यांच्या कुटुंबात पत्नी एंटोनिया मिनेकोला आणि दोन मुली आहे. त्यांच्या पत्नी अमेरिकन असून डान्स देखील आहेत. झाकिर हुसैन आणि एंटोनिया यांनी दोन मुली देखील आहेत. अनीसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी असं त्यांच्या मुलींची नावे आहेत. त्यांची पत्नी प्रसिद्ध कथक नृत्यांगना सितारा देवी यांच्या शिष्या होत्या.