Varun Dhawan | वरुण धवन याचे जवान चित्रपटाबद्दल मोठे भाष्य, थेट म्हणाला, मला लहान मुलासारखे वाटले आणि…

| Updated on: Sep 13, 2023 | 3:16 PM

वरुण धवन याचा काही दिवसांपूर्वीच बवाल हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये वरुण धवन हा जान्हवी कपूर हिच्यासोबत दिसला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन हे केले जात होते. वरुण धवन हा सध्या विदेशात त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

Varun Dhawan | वरुण धवन याचे जवान चित्रपटाबद्दल मोठे भाष्य, थेट म्हणाला, मला लहान मुलासारखे वाटले आणि...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा जवान हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. जवान हा चित्रपटाला रिलीज होऊन आता सहा दिवस झाले आहेत. विशेष बाब म्हणजे जवान (Jawan) या चित्रपटाने सहा दिवसांमध्येच तब्बल 600 कोटींचे कलेक्शन हे जगभरातून केले आहे. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट तूफान अशी कामगिरी करताना दिसत आहे. शाहरुख खान याच्या चित्रपटाचा एक जलवा हा बाॅक्स आॅफिसवर नक्कीच बघायला मिळतोय.

शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. या चित्रपटाने सुसाट अशी कामगिरी केलीये. जवान चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. शाहरुख खान याने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाची क्रेझ ही फक्त चाहत्यांमध्येच नाही तर सेलिब्रिटींमध्येही बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अनेकजण हे जवान चित्रपटाचे काैतुक करताना दिसत आहेत. नुकताच बाॅलिवूड स्टार वरुण धवन याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये वरुण धवन हा जवान चित्रपटाचे काैतुक करताना दिसत आहे.

वरुण धवन याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जवान हा ब्लॉकबस्टर चित्रपट नक्कीच आहे. शाहरुख खान याच्या या चित्रपटामध्ये स्टारडमसोबत अभिनयही पाहायला मिळाला आहे. लहान मुलाला कँडी स्टोअरमध्ये जशी मजा येते तशीच मजा मला देखील आलीये. खरोखरच ऍटली कुमार यांनी प्रत्येक क्षण सुंदरपणे नक्कीच दाखवला आहे.

आता वरुण धवन याने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. वरुण धवन याच्या या पोस्टवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. वरुण धवन हाच नाही तर यापूर्वी काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत जवान चित्रपटाचे काैतुक केले होते. विशेष म्हणजे वरुण धवन ही हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये गेली.

वरुण धवन याचा काही दिवसांपूर्वीच बवाल हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे वरुण धवन याच्यासोबत या चित्रपटामध्ये बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही मुख्य भूमिकेत होती. मात्र, या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही. वरुण धवन हा सध्या विदेशात त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतोय. वरुण धवन याने काही दिवसांपूर्वीच एक फोटो शेअर केला.