खूप कमी लोकांना माहितीये बॉबी देओलची प्रेम कहाणी, मोठ्या घराण्यातली आहे त्याची पत्नी

| Updated on: May 30, 2024 | 6:25 PM

अभिनेता बॉबी देओल गेल्या काही वर्षात अचानक चर्चेत आला आहे. अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर आता मात्र बॉबी देओलची क्रेझ वाढली आहे. बॉबी देओला अनेक सिनेमांचे ऑफर येत आहे. पण बॉबीने आश्रम वेब सीरीजकडे फोकस केले आहे. बॉबी देओलची लव्हस्टोरी देखील रंजक आहे.

खूप कमी लोकांना माहितीये बॉबी देओलची प्रेम कहाणी, मोठ्या घराण्यातली आहे त्याची पत्नी
Follow us on

अभिनेता धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील दोन्ही सूना म्हणजेच सनी देओल आणि बॉबी देओल यांची पत्नी तसेच त्यांच्या सासू प्रकाश कौर या नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहतात. दोन्ही सून मोठ्या घराण्यातल्या होत्या. बॉबी देओलची पत्नी तान्याने सांगितले होते की, तिच्या सासरच्या लोकांनी तिला खुल्या मनाने स्वीकारले होते. तिचे वहिनी पूजासोबत त्याचे चांगले संबंध आहेत आणि दोघेही एकत्र घरातली कामे करतात.

अबू जानी आणि संदीप खोसला यांना दिलेल्या एका मुलाखतीत तान्या देओलने सांगितले होते की, ती आणि पूजा दोघी घरातील कामाचे वाटप करतात म्हणजे जेणेकरून कोणावरही कामाचा ताण येऊ नये. आम्ही महिन्याला कामाचे वाटप करायचो.

तान्या-बॉबीची प्रेमकहाणी

तान्या ही करोडपती बँकर दिवंगत देवेंद्र आहुजा यांची मुलगी आहे. बॉबी देओल आणि ती एका इटालियन कॅफेमध्ये भेटले होते. ती भाऊ आणि काही मित्रांसोबत तिथे गेली होती. बॉबी देओलने तिला तिथे पहिल्यांदा पाहिले होते. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता. पहिल्या भेटीनंतर दोघेही अनेकदा एकमेकांना भेटत राहिले. त्यानंतर चंकी पांडेच्या घरी एका दिवाळी पार्टीत ते पत्ते खेळत असताना बॉबी देओल तेथे आला आणि तो देखील तिच्यासोबत खेळू लागला. तान्याला तो हरवत राहिला. तो तिला बाहेर जेवायला घेऊन जाईल असं त्याने यावेळी म्हटले होते.

तान्याने पुढे सांगितले की, एकदा बॉबी देओलने तिला रात्री उशिरा फोन केला होता, पण तेव्हा तिने फोन उचलला नाही. आधी बॉबी देओलला वाटले की, तान्या त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. मग दुसऱ्या दिवशी तान्याने कोणाचा फोन होता म्हणून माहिती घेण्यासाठी फोन केला होता. तेव्हा त्याचा हा भ्रम दूर झाला. त्यानंतर बॉबीने तिला पुन्हा फोन केला. दोघेही फोनवर जवळपास सात तास बोलत होते.

मग हळूहळू रोज असे फोन सुरु झाले. त्यानंतर बरेच दिवस रिलेशनशिपममध्ये राहिल्यानंतर दोघांनी विवाह केला.

Animal सिनेमामुळे बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉबी देओल त्याआधी आश्रम या वेब सीरिजमुळे चर्चेत होता. सध्या त्याच्याकडे अनेक ऑफर्स येत आहेत. पण त्याने आश्रम या वेब सीरीजकडे पुन्हा लक्ष वळवले आहे.