चिट्ठी आई है आई है… गाण्याने वेड लावणारे प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा

| Updated on: Feb 26, 2024 | 6:14 PM

Pankaj Udhas Death News : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. नुकताच पंकज उधास यांचे निधन झाले आहे. याबाबतची पोस्ट त्यांच्या मुलीने शेअर केलीये. भारतातील उत्कृष्ट गझल गायक म्हणून पंकज उदास हे प्रसिद्ध होते. पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला होता. 1980 ते 1990 च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले.

चिट्ठी आई है आई है... गाण्याने वेड लावणारे प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा
Follow us on

मुंबई :  26 फेब्रुवारी 2024 : चिट्ठी आई है आई है… या गाण्याने देश-विदेशातील भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणणारे प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 72व्या वर्षी पंकज उधास यांनी अंतिम श्वास घेतला. पंकज उधास यांची कन्या नायाब उधास यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. उधास यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. चिट्ठी आई है आई है…, ना कजरे की धार ना मोतियों के हार…, आज फिर तुम पे प्यार आया है…, चाँदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल… आदी लोकप्रिय गाण्यांमुळे पंकज उधास तरुणाईंच्या गळातील ताईत झाले होते. त्यांच्या निधनामुळे देश एका मोठ्या गायकाला मुकला आहे.

आता पंकज उधास यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे नक्कीच बघायला मिळतंय. पंकज उधास यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. पंकज उधास यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. पंकज उधास यांच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून चाहत्यांना धक्का बसलाय. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची बातमी मुलीने दिलीये.

भारतातील उत्कृष्ट गझल गायक म्हणून पंकज उधास हे प्रसिद्ध होते. पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951  रोजी गुजरातमध्ये झाला होता. 1980 ते 1990 च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मधुर आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

26 फेब्रुवारी 2024 रोजी पंकज उधास यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास यांच्यावर उपचार सुरू होते. पंकज उधास यांनी शेवटचा श्वास आयसीयूमध्ये घेतला. भारतातील उत्कृष्ट गझल गायक म्हणून पंकज उधास यांनी ओळख होती.