मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि उद्योजक विकी जैन यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अंकिता लोखंडे – विकी जैन यांची ओळख इंडस्ट्रीमधील ‘पॉव्हर कपल’ म्हणून देखील आहे. त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. दरम्यान, अंकिता हिने पती विकी जैन याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. ‘पतीने मला विकलं…’ असं वक्तव्य अर्चना हिने केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. तर अंकिता असं का आणि कुठे म्हणाली जाणून घेवू. नुकताच ‘बिग बॉस १७’ शोची सुरुवात झाली. शोमध्ये एकून १७ जणांनी प्रवेश केला आहे.
‘बिग बॉस १७’ कपल्स देखील दिसणार आहेत. ‘बिग बॉस १७’मध्ये टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडप्यांनी एन्ट्री केली आहे. पहिल्या जोडीचं नाव निल – ऐश्वर्या असून दुसरी जोडी अंकिता आणि विकी यांची आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये दमदार रोमाँटिक पारफॉर्मेंसने दोघांनी चाहत्यांची मने जिंकली. याच दरम्यान दोघांनी अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान याच्यासोबत गप्पा मारल्या.
सलमान याने अंकिता हिला विचारलं, ‘गेल्या अनेक वर्षांपासून तुला शो ऑफर होत आहे…’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘यावेळी माझ्या पतीने मला विकलं आहे…’ अंकिता हिच्या उत्तरानंतर सलमान म्हणाला, ‘विकी याला शोमध्ये यायचं होतं….’ विकी याच्यामुळे शोमध्ये येण्यास होकार दिला… असं देखील अंकिता म्हणाली.
सध्या सर्वत्र अंकिता आणि विकी जैन यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. विकी आणि अंकिता यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय होत असतात. चाहते देखील त्यांच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
अंकिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मालिकेत अभिनेत्री अर्चना या भूमिकेला न्याय दिला. मालिकेतच अंकिता आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्यामध्ये प्रेम बहरलं. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं.
पण अंकिता आणि सुशांत यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर अंकिता हिच्या आयुष्यात विकी याची एन्ट्री झाली. आज अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात.