मुंबई : सध्या बॉलिवूडसह मनोरंजन विश्वाला चाहूल लागली आहे ती कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा आहे. सध्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच लग्नाच्या विधींना सुरूवात होणार आहे. त्यामुळे सध्या लगीनघाई सुरू आहे. याबहुचर्चीत लग्नात काही खास नियम असणार आहेत. आता हे कोणते नियम असतील? याबाबतही सर्वांना जाणून घ्यायचं होतं तेही आता स्पष्ट होताना दिसत आहे.
लग्नातील नियमवलीबाबत सूची तयार
या लग्नात काय नियम असतील याबाबत एक सूची तयार करण्यात आलीय. त्यात लिहलं आहे, तुम्ही सर्वांनी इथपर्यंतच्या प्रवासाचा आनंद लुटला असेलच. आपण सर्वांनी आपला मोबाईल रुममध्ये सोडून यावं अशी आमची अपेक्षा आहे, या लग्नाचे फोटो कुठेही अपलोड होणार नाहीत याची काळजी घ्यावी. असे काही खास नियम लागू केले आहेत.
लग्नासाठी मोजक्याच लोकांना निमंत्रण
विकी आणि कतरीनाच्या लग्नासाठी सर्व पाहूणेही सवाई माधोपूरमध्ये दाखल झाले आहेत. लग्नासाठी मात्र काही मोजक्याच लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. बॉलिवूडमधील काही दिग्गज लग्नाला उपस्थिती लावणार आहे. कतरीना तिच्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमात तिच्या काही खास गाजलेल्या गाण्यांवर डान्स करताना दिसून येणार असल्याचीही चर्चा आहे. कोरोनाकाळात लग्न होत असल्यानं हॉटेलने घालून दिलल्या नियमावलीतच विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यामुळे खूप कमी लोकांना बोलवता आलं आहे.
फक्त हेच असणार लग्नासाठी उपस्थित
करण जौहर, फराह खान, नित्या मेहरा, डॉक्टर ज्वेल गामाडिया, यास्मीन कराचीवाला (ट्रेनर), अमित ठाकूर (हेयर स्टाइलिस्ट), डेनियल बाउर (मेकअप आर्टिस्ट) अंगद बेदी, नेहा धूपिया, सनी कौशल आणि शरवरी वाघ, कबीर खान, मिनी माथुर और अंगिरा धर सारखे काही मोजकेच लोक या लग्नात उपस्थित असणार आहेत.