Vicky Kaushal | विकी कौशल याने सुखी वैवाहिक आयुष्याचे केले गुपित उघड, म्हणाला, फक्त पत्नीला…

| Updated on: Jun 27, 2023 | 3:29 PM

बाॅलिवूड अभिनेता विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे विकी कौशल यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. सारा अली खान आणि विकी यांच्या जोडीने धमाकेदार कामगिरी ही नक्कीच बाॅक्स आॅफिसवर केलीये.

Vicky Kaushal | विकी कौशल याने सुखी वैवाहिक आयुष्याचे केले गुपित उघड, म्हणाला, फक्त पत्नीला...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल (Vicky Kaushal) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच विकी काैशल आणि सारा अली खान यांचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सारा आणि विकी काैशल यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद देखील मिळालाय. विकी काैशल आणि सारा अली खान (Sara Ali Khan) हे जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये जाऊन या जोडीने प्रमोशन केले. चक्क जयपुरमध्ये (Jaipur) शाॅपिंग करताना देखील सारा अली खान ही दिसली होती. सध्या विदेशात सुट्टया घालवताना विकी काैशल हा दिसत आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे विकी काैशल हा जोरदार चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये विकी काैशल याने सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र सांगितला आहे. नेहमीच विकी काैशल हा कतरिना कैफ हिचे फोटो शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच पहिला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विकी काैशल आणि कतरिना विदेशात गेले होते.

इतकेच नाही तर विकी काैशल याच्या जरा हटके जरा बचके चित्रपटाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत कतरिना कैफ हिने चाहत्यांना हा चित्रपट बघण्यासाठी देखील सांगितले. प्रेक्षकांना सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रचंड आवडली. सारा आणि विकी यांच्या जोडीचे काैतुकही करण्यात आले.

नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये विकी काैशल याने आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना म्हटले की, वैवाहिक आयुष्य सुखी जगाचे असेल तर तुमच्याकडे धैर्य असणे खूप जास्त आवश्यक आहे. विशेष म्हणजे दोन लोक एकाच गोष्टीवर सहमत होणे इतके सोपे नक्कीच नसते. यामुळे समजदारी खूप जास्त महत्वाची असते.

पुढे विकी काैशल म्हणाला की, हा सर्व अनुभव मला माझ्या लग्नाच्या दिड वर्षांमध्ये आलाय. मी माझ्या पत्नीवर आणि माझ्या कुटुंबावर खूप जास्त प्रेम करतो. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांनी राजस्थानमध्ये लग्न केले. अत्यंत खासगी पध्दतीने यांचा विवाह सोहळा हा पार पडला. लग्नाच्या काही वर्षे अगोदर विकी आणि कतरिना हे दोघे एकमेकांना डेट करत होते. चाहते देखीव विकी काैशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची आतुरतेने वाट बघताना दिसले.