Chhaava: घर बसल्या पाहता येणार ‘छावा’ सिनेमा, पण कधी, कुठे आणि कसा? घ्या जाणून

| Updated on: Mar 21, 2025 | 2:19 PM

Chhaava on OTT: बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपये जमा केल्यानंतर 'छावा' सिनेमा येणार घर बसल्या पाहता, सिनेमा कधी होणार ओटीटीवर प्रदर्शित? तारीख अखेर समोर, सध्या सर्वत्र 'छावा' सिनेमाची चर्चा...

Chhaava: घर बसल्या पाहता येणार छावा सिनेमा, पण कधी, कुठे आणि कसा? घ्या जाणून
Follow us on

Chhaava on OTT: अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेनाने तब्बल दोन महिने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कलेक्शन केलं. ‘छावा’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील नवीन विक्रम रचले. आता सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार… जाणून घेवू.

रिपोर्टनुसार, ‘छावा’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमा 11 एप्रिल 2025 मध्ये स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या ओटीटी रीलीजच्या प्रतिक्षेत आहेत.

हे सुद्धा वाचा

 

 

अनेकांनी सिनेमा चित्रपटगृहात पाहिला आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक जण सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असतील… यात काही शंका नाही. सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार अशी माहिती समोर येत आहे. पण सिनेमाचे डिजीटल राईट्स कोणाकडे आहेत… अद्याप समोर आलेलं नाही.

‘छावा’ हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारलेला आहे. यामध्ये विक्की कौशलने मराठा योद्ध्याची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी प्राण फुंकले आहेत. त्याच्या दमदार कामगिरीचे खूप कौतुक होत आहे.

 

 

अक्षय खन्नाच्या भूमिकेचं कौतुक

विकी कौशलच्या ‘छावा’मध्ये अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदान्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यामध्ये अक्षय खन्नाने खलनायकाची भूमिका साकारली असून औरंगजेबाच्या भूमिकेतील त्याच्या जबरदस्त अभिनयाचे कौतुक होत आहे. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.