‘छावा’ सिनेमाला यश, विकी कौशल पोहोचला 300 वर्ष जुन्या शिव मंदिरात, असं केल्यानं पूर्ण होतात सर्व मनोकामना

| Updated on: Feb 22, 2025 | 10:40 AM

'छावा' सिनेमा प्रेक्षकांना दिल भरभरुन प्रेम, विकी कौशलने घेतले 300 वर्ष जुन्या शिव मंदिराचे दर्शन, तेथील पवित्र तलाव चमत्कारिक असल्याची मान्यता, मंदिरात असं केल्याने पूर्ण होतातत सर्व इच्छा...

छावा सिनेमाला यश, विकी कौशल पोहोचला 300 वर्ष जुन्या शिव मंदिरात, असं केल्यानं पूर्ण होतात सर्व मनोकामना
Follow us on

अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सलग आठ दिवस सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करताना दिसत आहे. सिनेमात अभिनेत्या छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका बजावली आहे. दरम्यान, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी विकी एका 300 वर्ष जुन्या शिव मंदिरात पोहोचला होता. ‘छावा’ सिनेमाचं प्रमोशन सुरू करताना, विकीने महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात जाऊन शंकराचे आशीर्वाद घेतले. विकी कौशलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटोही शेअर केले आहेत.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये विकी कौशल मनोभावे पूजा करताना दिसत आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचं महत्त्व काय आहे… ते आज जाणून घेवू… घृष्णेश्वर मंदिर हे छत्रपती संभाजी नगर याठीकाणी आहे. मराठा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग मानलं जातं आणि ते परमेश्वराला समर्पित आहे. हे मंदिर एलोरा लेणीपासून फक्त 1.5 किमी अंतरावर आहे.

कुसुमा या महिलेने येथे ताडाच्या झाडाखाली शिवलिंगाची पूजा केली होती. असं म्हणतात की जेव्हा मधमाशीने शिवलिंगावर मध टाकला तेव्हा ते स्थान पवित्र मानलं गेलं आणि नंतर येथे मंदिर बांधण्यात आलं…. अशी मान्यता आहे.

घृष्णेश्वर मंदिर उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय स्थापत्यशास्त्राच्या मिश्रणाने बांधलेलं आहे. त्यात सुंदर नक्षीकाम आणि शिल्प पाहायला मिळतात. मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथे एक जुने उंबराचे झाड आहे, जे सुमारे 300 वर्षे जुने असल्याचे सांगितलं जातं.

या 300 वर्ष जुन्या झाडाला धागा बांधल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. इच्छा पूर्ण झाल्यावर भक्त धागा सोडतात. एवढंच नाही तर, मंदिराजवळ स्थित शिवालय तीर्थ नावाचा पवित्र तलाव आहे आणि तो देखील चमत्कारिक मानला जातो. लोकांचा असा विश्वास आहे की या तलावाच्या पाण्यात रोग बरे करण्याची शक्ती आहे.

मंदिर परिसरात फिरण्यासाठी अन्य स्थळ

जर तुम्ही या मंदिराला भेट द्यायला गेलात तर तुम्हाला आजूबाजूची अनेक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणेही पाहता येतील. लोरा लेणी, अजिंठा लेणी, देवगिरी किल्ला आणि बीबी का मकबरा याठिकाणी देखील तुम्ही फिरू शकता.